- जाहिरात -spot_img
breaking news

‘हॉटेल रेटिंग’च्या नावाखाली व्यावसायिकाची २६ लाखांची फसवणूक; सायबर भामट्यांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

येथील रहिवासी असलेल्या सचिन प्रकाश काटे यांना ऑनलाइन हॉटेल रेटिंग देण्याचे आमिष दाखवून २५ लाख ९४ हजार ३९० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०२५ ते ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ही घटना घडली. संशयित आरोपी दीपक नायर उर्फ नविनराज आणि मेघा उर्फ मालू या दोघांनी व्हॉट्सपच्या माध्यमातून फिर्यादीशी संपर्क साधला. हॉटेलला ऑनलाइन रेटिंग दिल्यास तुम्हाला २० ते ३० टक्के नफा मिळवून देतो, अशी थाप मारून त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

या आमिषाला बळी पडून फिर्यादीने आरोपींना रक्कम दिली. मात्र, परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक नायर आणि मेघा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, सायबर गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.

हे सुद्धा वाचा :  कांदा आंदोलन भोवले, या १५ जणांवर गुन्हे दाखल, कारण काय पहा..
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ