अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका स्पष्ट होत नसतानाच, काँग्रेसने दिल्लीतून विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचे संकेत देताच, त्यावर नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहिल्यानगरमध्ये येत पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहोत. जे काही होईल, ते महाविकास आघाडी मिळून करू. प्राजक्त तनपुरे काही संपर्कात नाही. आम्ही आमचा उमेदवार देण्याच्या दृष्टीने योग्यवेळी निर्णय घेऊ आणि निवडून आणू असे थोरात यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहोत. जे काही होईल, ते महाविकास आघाडी मिळून करू. प्राजक्त तनपुरे काही माझ्या संपर्कात नाही. आम्ही आमचा उमेदवार देण्याच्या दृष्टीने योग्यवेळी निर्णय घेऊ. सोमवारपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तोपर्यंत उमेदवार तयार होईल, आमचा उमेदवार राहणार अन् तो निवडून देखील येईल, असेही थोरात यांनी म्हटले आहे.










