- जाहिरात -spot_img
breaking news

‌‘प्रति पिताश्री‌’च्या पेहरावात ‌‘अक्षय‌’चे विधिमंडळात पाऊल; पायरीवर डोके ठेवून…

तशीच टोपी, तोच तीन गुंडी सदरा व तोच दूधवाला पायजमा; विधिमंडळाच्या पायरीवर डोके ठेवून प्रवेश
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
तोच तीन गुंडी सदरा (खमीस), तशीच टोपी, तसाच दूधवाल्याचा पायजमा! आमदार होण्याअगादेर स्व. शिवाजीराव कर्डिले दुधाचे रतीब घालायचे. त्यावेळी त्यांचा पेहराव तीन गुंडी शर्ट, टोपी अन्‌‍ पायजमा असायचा. दूधवाल्याचा आमदार झाल्यानंतरही शिवाजीरावांच्या या पेहरावात कसलाही फरक पडला नाही. आमदार झाल्यानंतरही त्यांनी आपली ‌‘खरी ओळख‌’ पुसली नाही. पांढरे दूध, पांढरे कपडे. आमदारपदी विराजमान होऊनही त्यात कसलेही नाही ‌‘वाकडे‌’ असे ते जगले. आपल्या वडिलांचा तोच कित्ता गिरवत नूतन आमदार अक्षय कर्डिले यांनीही त्याच पेहरावात विधिमंडळात पाऊल ठेवून उपस्थितांना आपल्या वडिलांची आठवण करून दिली व सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवत जनतेचा विश्वास संपादन करणारे नवनिर्वाचित आमदार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांचा आज मुंबईतील विधानभवनात आमदारपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. मतदारसंघाच्या विकासासाठी नव्या अध्यायाची सुरुवात होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक़्त होत आहे.

राजकारणात सक्रिय होण्यापूवच जनतेच्या प्रश्नांशी थेट नाळ जोडणारे अक्षय कर्डिले यांनी आपल्या आगळ्यावेगळ्या जनता दरबार उपक्रमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. पाणी, वीज, रस्ते, महसूल, आरोग्य, शिक्षण यांसह विविध प्रश्नांसाठी नागरिकांना प्रशासनापर्यंत पोहोचवून न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. त्यामुळेच पोटनिवडणुकीत मतदारांनी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवत भरघोस मतांनी विधानसभेत पाठविले.

शपथविधीनंतर राहुरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न माग लावणे, विकासकामांना गती देणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींवर तत्काळ उपाययोजना करणे, यावर आपला भर राहणार असल्याचे कर्डिले समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. उद्याचा शपथविधी हा केवळ एका आमदाराचा नसून राहुरीच्या विकासाच्या नव्या संकल्पनेचा प्रारंभ असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.

राहुरीच माझे कुटुंब
मतदारसंघाच्या विकासासाठी मी सज्ज आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी दिलेला भरभरून आशीर्वाद आणि विश्वास यामुळेच विधानसभेत जाण्याची संधी मिळाली आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी ज्या पद्धतीने जनतेचे प्रश्न सोडविण्याचे कार्य केले, त्याच विचारांचा वारसा पुढे नेत प्रत्येक नागरिकासाठी उपलब्ध राहणार आहे. आता संपूर्ण मतदारसंघाची जबाबदारी माझी असून हा मतदारसंघच माझे कुटुंब आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र काम करणार असल्याची भावना नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा :  सप्ताहाच्या पंगतीत राडा, नागापुरातून केबलची चोरी, ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू, कुठे काय घडलं पहा..
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ