- जाहिरात -spot_img
breaking news

केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्ट; सियाने चार महिन्यांपूर्वीच चेतनसोबत लग्न उरकलं, प्लॅनिंग ऐकून पोलीसही हादरले

पुणे / नगर सह्याद्री –
लोहगड हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या दोघांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न उरकले होते, असा दावा पोलिसांनी केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅटची तपासणी केली असता, त्यातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा मोठा दावा करण्यात आला आहे. पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल खून प्रकरणातील तपासामध्ये मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या हाती लागलेल्या दोघांच्या व्हॉट्सॲप चॅटमधून लग्नाची गोष्ट समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

कुटुंबापासून लपवून ठेवली लग्नाची गोष्ट
सिया गोयाल आणि चेतन चौधरी या दोघांच्या चौकशीदरम्यान; तसेच त्यांच्या मोबाइलमधील चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीच्या तपासातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. सहा ते सात महिन्यांतील डिजिटल माहितीची पोलिसांकडून सखोल पडताळणी सुरू आहे. तपासादरम्यान सिया आणि चेतन यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप विवाह केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या दोघांनी कुटुंबीयांपासून लपवून लग्न केलं होतं, असेही तपासात समोर आले आहे. हा विवाह केतन आणि सिया यांच्या १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या साखरपुड्याच्या आसपासच झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र हे गुपचूप लग्न नेमकं साखरपुड्याच्या आधी झालं की नंतर, हे स्पष्ट झालेलं नाही.

केतनला ढकलून देण्याआधी सियाने बघितल्या अनेक वेब सिरीज
व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या खूनातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याबाबत आता पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघांनी केतनच्या खूनासाठी अनेक वेब सिरीज तसेच पॉडकास्ट आणि देशातील वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती घेतल्याचेही समोर आले आहे. लोहगडावरून ढकलून देऊन व्यावसायिक केतन अग्रवाल याचा होणारी पत्नी सिया गोयल व तिचा बॉयफ्रेड चेतन चौधरी यांनी हत्या केली. याप्रकरणात दोघांच्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तर त्यांच्यामधील झालेले संभाषण तसेच चॅटिंग यामधून वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपींच्या मोबाईलमधील सहा ते सात महिन्यांपासूनच्या चॅटिंगची सखोल पडताळणी केली.

हे सुद्धा वाचा :  अजित पवार अपघात प्रकरणात रोहित पवारांचे स्फोटक दावे; काळी जादू, तीन दिवसांची पूजा अन खरात कनेक्शन, काय म्हणाले पहा

पॉडकास्ट, व्हिडिओ आणि वेब सिरीज पाहून गुन्हा कसा करावा, याविषयी माहिती घेतल्याचे समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये घडलेल्या खुनांच्या घटनांचा अभ्यास करून कोणत्या पद्धतीने गुन्हा केल्यास संशय कमी येईल, याबाबत आरोपींनी माहिती गोळा केल्याचे निष्पन्न झाले आहे. चाकू किंवा इतर शस्त्र वापरून खून केल्यास पुरावे सहज मिळू शकतात व आरोपी पकडले जाण्याची शक्यता वाढते, असा निष्कर्ष आरोपींनी काढला होता. या गोष्टी घेण्यासाठी कुठेना कुठे जावे लागेल, त्या सांभाळाव्या लागतील अथवा घटनेनंतर त्या लपवून ठेवाव्या लागतील. त्यामुळे कोणतेही शस्त्र न वापरता उंच कड्यावरून ढकलून देऊन खूनाचा निर्णय घेतल्याचे सियाने चौकशीत सांगितल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. याप्रकरणातील डिजिटल पुरावे, मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इतर तांत्रिक बाबींची तपास यंत्रणेकडून पडताळणी सुरू आहे

काय आहे प्रकरण?
१८ जून रोजी लोहगडावरून ढकलून केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आली होती. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनाही अटक केली आहे. सध्या हे दोन्ही आरोपी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या कोठडीदरम्यानच पोलिसांनी केलेल्या तपासात आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या छाननीतून त्यांच्या गुपचूप लग्नाची ही नवी माहिती समोर आली आहे.

सिया गोयलचं प्लॅनिंग ऐकून चौकशी करणारे पोलीसही हादरले, नेमकं काय घडलं?
पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणात दररोज नवी आणि चक्रावणारी माहिती समोर येताना दिसत आहे. केतन अग्रवाल हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याचे लग्न सिया गोयल हिच्यासोबत ठरले होते. मात्र, सियाचे चेतन चौधरी याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याने या दोघांनी केतन अग्रवाल याला लोहगड किल्ल्यावरुन ढकलून ठार मारले होते. सध्या सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघेही पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांकडून या दोघांची कसून चौकशी सुरु आहे. यावेळी सिया गोयलने केतनला मारण्याच्या कटाबाबत दिलेली कबुली आणि त्याचे प्लॅनिंग ऐकून चौकशी करणारे पोलीसही चक्रावून गेले आहेत.

हे सुद्धा वाचा :  शिर्डीत तोफगोळा उत्पादन प्रकल्प; जिल्ह्यात संरक्षण उत्पादन क्षेत्राला मोठी चालना!

सिया गोयल हिने केतन अग्रवाल याला मारण्यापूर्वी हत्या कशी करायची, पकडले गेल्यास काय करायचे, याचा नीट सखोल अभ्यास केला होता. यासाठी तिने गुगलवरील माहिती, वेब सिरीज आणि काही पॉडकास्ट पाहिले होते. अवघ्या 20 वर्षांची सिया गोयल ही एखाद्या कसलेल्या गुन्हेगाराप्रमाणे विचार करु शकते, हे पाहून पोलिसांनाही चांगलाच धक्का बसला आहे.

सिया गोयल हिला केतनची हत्या केल्यानंतर आपण पकडले जाऊ शकतो, याची भीती होती. त्यामुळे तिने अगोदरच या सगळ्याचा अभ्यास केला होता. महिला गुन्हेगारांना पोलीस कोठडीत कशी वागणूक मिळते, महिला आरोपींना मारहाण होते का, याबद्दल सियाने बरीच माहिती गोळा केली होती. 20 वर्षांची मुलगी किती गुन्हेगारी स्वरुपाचा विचार करु शकते, हे यानिमित्ताने समोर आले आहे. हत्या केल्यानंतर पोलीस अटक करतील, तेव्हा आपल्यासोबत काय घडू शकतं? एकदा अटक झाल्यावर हत्येच्या गुन्ह्यात जामीन किती दिवसांनी आणि कसा मिळतो? याची माहिती सियाने गोळा केली होती. यासाठी तिने देशभरात गाजलेल्या राजा रघुवंशी हत्याप्रकरणातील आरोपी सोनम रघुवंशी हिने जामीन कसा मिळवला होता, तसा जामीन आपल्यालाही मिळू शकतो का, याची तपशीलवर माहिती गोळा केल्याचे आता समोर आले आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ