- जाहिरात -spot_img
breaking news

खर्ड्याची कन्या धारा बीडकर भारतीय तिरंदाजी संघात

15 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; जामखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
जामखेड | नगर सह्याद्री

तालुक्यातील खर्डा गावाची कन्या धारा बीडकर हिने आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. खर्डा येथील मूळ रहिवासी तथा सध्या पुणे येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. अमोल बीडकर यांच्या कन्येची संयुक्त अरब अमिरात (यूएई) येथे होणाऱ्या सब ज्युनिअर आशियाई युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. अवघ्या 15 व्या वष भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळाल्याने खर्डा गावासह जामखेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

तिरंदाजीसारख्या अत्यंत कौशल्यपूर्ण खेळात सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर धाराने हे यश मिळवले आहे. लहान वयापासूनच तिने या खेळात विशेष प्राविण्य मिळवत विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांतील सातत्यपूर्ण यशाच्या बळावर तिची भारतीय संघात निवड झाली आहे.धाराच्या यशामागे तिच्या कुटुंबीयांचे, प्रशिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचे मोलाचे योगदान आहे. धाराचे आजोबा अशोक बीडकर हे निवृत्त रयत सेवक असून आजी महानंदा बीडकर या खर्डा येथे बांगड्यांचा व्यवसाय करतात. नातीच्या या यशामुळे संपूर्ण बीडकर कुटुंबासह खर्डा गावात आनंदाचे वातावरण आहे.

 

हे सुद्धा वाचा :  एमआयडीसीमध्ये औद्योगिक गॅस टंचाईचा प्रश्न गंभीर; आमी संघटनेने काय केले पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ