मुंबई / नगर सह्याद्री –
भारतील क्रिकेटसंघाचा दमदार क्रिकेटपटू मोहम्मद शमी त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. सांगायचं झालं तर, मोहम्मद शमी याचे बायको हसीन जहां हिच्यासोबत वाद सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हसीन तिच्या मुलीसोबत वेगळी राहत आहे. मोहम्मद शमी आणि हसीन यांचा अद्याप घटस्फोट देखील झालेला नाही आणि दोघे एकत्र देखील नाही. अशात हसीन सोशल मीडियावर कायम वादग्रस्त पोस्ट शेअर करत असते. आता देखील हसीन हिने पुन्हा सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे वाद टोकाला पोहोचले आहेत.

हसीन हिने एक फोटो शेअर केला आहे आणि वाईट वंशाच्या लोकांबद्दल काही लिहिलं आहे. ज्यामुळे वाद विकोपाला गेला आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत हसीन म्हणाली, ‘घरंदाज व्यक्ती असेल तर, त्याला स्वतःला लाज वाटेल, जर त्याने तुमच्यासोबत काही वाईट केलं असेल. पण घाणेरड्या वंशाचे लोक एखाद्यासोबत वाईट करुन देखली घमंडी स्वभावाने फिरतील…’ एवढंच नाही तर, पोस्ट शेअर करत हसीन कॅप्शनमध्ये म्हणाली, ‘जर चांगल्या घरातील व्यक्ती असेल, तर त्याला वाईट वाटेल, जर त्याने तुमच्यासोबत काही वाईट केलं असेल तर, पण घाणेरड्या वंशाच्या लोकांना काहीच फरक पडणार नाही.’, सध्या हसीन हिची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामळे मोहम्मद शमी याच्या चाहत्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हसीन हिला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘असं वाटत आहे की, ती स्वतःबद्दल बोलत आहे.’, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘जे काही म्हणालीस ते अगदी बरोबर आहे, ही गोष्ट तुझ्यावर लागू होत आहे.’ अन्य एक नेटकरी संतापात म्हणाला, ‘कोण घरंदाज आहे आणि कोणाकडे लाज आहे… ते सर्वांना माहिती आहे…’, अशा कमेंट हसीन हिच्या पोस्टवर नेटकरी करत आहेत. हसीन कायम तिच्या वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. हसीन आणि मोहम्मद शमी यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिल्यानंतर, हसीन हिने नव्या आयुष्याची सुरुवात केली, दरम्यान, तिची ओळख शमी याच्यासोबत झाली. 2012 मध्ये हसीन आणि शमी यांची ओळख झाली. तेव्हापासून शमी आणि हसीन यांची लव्हस्टोरी सुरु झाली. जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2014 मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यामध्ये वाद सुरु आहेत.










