- जाहिरात -spot_img
breaking news

गौरी शुगर अँड डिस्टिलरीजचा ऐतिहासिक टप्पा ; एक कोटी लिटर इथेनॉल उत्पादन पूर्ण

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
कर्नाटकातील भालकी तालुक्यातील बाजोलगा येथे कार्यरत गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. (युनिट क्र. 13) ने इथेनॉल उत्पादनात ऐतिहासिक यश संपादन करत 1 कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रेपाटील यांनी अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञ, ऊस उत्पादक शेतकरी तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले.

या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना बाबुराव बोत्रेपाटील म्हणाले, 1 कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचा टप्पा हा केवळ उत्पादनाचा आकडा नसून सर्वांच्या एकजुटीचा, प्रामाणिक परिश्रमाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराचा परिणाम आहे. ओंकार ग्रुपमधील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञ आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या अथक मेहनतीमुळेच हे यश शक्य झाले आहे.

ते पुढे म्हणाले की, गुणवत्तापूर्ण उत्पादन, सुरक्षित कार्यपद्धती, पर्यावरणपूरक उद्योगधोरण आणि शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत संस्था सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. इथेनॉल उत्पादनामुळे देशाच्या ऊर्जा स्वावलंबनाला बळ मिळत असून पर्यावरणपूरक इंधनाच्या वापरालाही चालना मिळत आहे.1 कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचा टप्पा गाठल्यामुळे गौरी शुगर अँड डिस्टिलरीजने औद्योगिक क्षेत्रात आणखी एक मानाचा टप्पा गाठला असून, भविष्यातही अत्याधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि शेतकरी हिताच्या बळावर प्रगतीची वाटचाल कायम ठेवण्याचा निर्धार व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा :  अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी संचालकांसह, अधिकाऱ्यांना झटका; 100 कोटींची मालमत्ता जप्त
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ