- जाहिरात -spot_img
breaking news

शेतात काम करत असताना वीज पडून तरुणाचा मृत्यू….

 

श्रीगोंदा | नगर सह्याद्री
तालुक्यातील घोडेगाव येथे शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून 22 वषय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे घोडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

घोडेगावचे माजी सरपंच रूपचंद देरेकर यांचे चिरंजीव अभिषेक रूपचंद देरेकर (वय 22) हे सोमवारी दुपारच्या सुमारास आपल्या शेतात ट्रॅक्टर चालवत काम करत होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांचे वडील रूपचंद देरेकर शेतात आले असता अभिषेक ट्रॅक्टरवरून खाली उतरले होते.

याचवेळी अचानक कडकडाटासह वीज कोसळली आणि ती थेट अभिषेक यांच्या अंगावर पडली. या भीषण घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत अभिषेक यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. घटनेनंतर मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.

 

हे सुद्धा वाचा :  लंडनमधून निघाली साता समुद्रापार पंढरपूरची वारी; 11 देशांचा प्रवास करून 50 दिवसांत पोहोचणार पंढरपूरला
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ