- जाहिरात -spot_img
breaking news

ढवळपुरी अत्याचार प्रकरण विधानसभेत गाजले; आ. दाते काय म्हणाले पहा…

जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी
पारनेर | नगर सह्याद्री

तालुक्यातील ढवळपुरी येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचार प्रकरणी आ. काशिनाथ दाते यांनी विधानसभेच्या अधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करत ठाम व आक्रमक भूमिका मांडली.

अधिवेशनात बोलताना आ. दाते यांनी संबंधित घटनेचा घटनाक्रम सभागृहासमोर मांडताना सांगितले की, ढवळपुरी गावातील दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असलेला कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना १० मार्च रोजी उघड झाली. सबंधित मुलगी आठवीत शिकत असून आरोपीने पीडित मुलीच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत गेल्या तीन वर्षांपासून तिच्यावर सातत्याने अत्याचार करत आलेला आहे.

आरोपीने ढवळपुरी व परिसरातील काही महिला व युवतींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून व पैशाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच या तथाकथित महाराजाने चार विवाह केलेले असून घटना घडली त्या दिवशी सबंधित आरोपीने या अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिला बांबू व इतर साधनाने मारहाण केली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर स्वयंपाक करण्याची पक्कड गरम करून त्याचे चटके तिला दिले आहे.ज्यामुळे त्या मुलीला चालणेही अवघड झाले आहे.

दरम्यानच्या काळात पीडितेला मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागला. या घटनेनंतर ढवळपुरी गावासह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.अशा विकृत प्रवृत्तीला कोणतीही माफी नाही. संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई होऊन त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि पीडितेला तातडीने न्याय मिळावा, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, अशी ठोस मागणीही त्यांनी केली. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून अशा घटनांवर कडक कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत आमदार दाते यांनी व्यक्त केले.

तालुक्यात महिलावरील अत्याचाराच्या घटनांत वाढ
मागील आठवड्यात कान्हूरपठार येथील दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार झाल्याची घटना घडलेली असतानाच पुन्हा ही घटना घडलेली आहे. पारनेर तालुयात सध्या महिलावरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांतील आरोपींच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.
– आमदार काशिनाथ दाते

हे सुद्धा वाचा :  कुकडीतून विसापूर धरणात पाणी सोडण्याचा निर्णय
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ