हवामान विभागाचा इशारा | दोन दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये गारपीट
पुणे | नगर सह्याद्री
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील वातावरण अस्थिर राहण्याची शयता असून अनेक भागांमध्ये मेघगर्जना, वीजांचा कडकडाट, वादळी वारे, गारपीट व हलका ते मध्यम पाऊस होण्याची शयता आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि काही कोकण भागात हवामानाचा परिणाम अधिक जाणवू शकतो. वादळी वार्याचा वेग ३० ते ६० किमी प्रति तास पर्यंत जाण्याची शयता आहे. काही भागांमध्ये गारपीटीचा धोका अधिक आहे. आज म्हणजेच ३१ मार्च रोजी ऑरेंज अलर्ट असल्यामुळे गारपीट व वादळी पावसाचा धोका जास्त आहे.
३१ मार्च रोजी हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची शयता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया उर्वरित भागात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शयता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस पावसाची शयता कायम असून येत्या १ एप्रिल रोजी सोलापूर, धाराशिव, लातूर, वाशिम, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्वरित भागात तुरळक स्वरूपाच्या पावसाची शयता वर्तविण्यात आली आहे. २ एप्रिल रोजी सोलापूर, धाराशिव, लातूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड, रत्नागिरी, बीड, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नंदुरबार, धुळे, ठाणे, बुलढाणा, अकोला, अमरावती, जालना, नंदुरबार, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत वादळी वार्यासह पावसाची शयता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दोन दिवस जिल्ह्याला झोडपले
गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. संगमनेर, श्रीरापूर, अकोले, नेवासा, राहुरी, अहिलन्यानगरमध्ये गारपीट झाल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीटीमुळे पिके भुईसपाट झाली आहेत. शेतकर्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. फळपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजून दोन दिवस वादळी वार्यासह गारपीटचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.










