- जाहिरात -spot_img
breaking news

प्राजक्त तनपुरेंच्या वाटेत काटेच काटे!; कर्डिलेंच्या बाजूने सहानुभूती!, काय घडतंय पहा

राहुरी मतदारसंघात सहानुभूतीची लाट अक्षय कर्डिलेंच्याच बाजूने | तनपुरेंना भाजपाने उमेदवारी दिली तरी…!
शिवाजी शिर्के / सारीपाट
शिवाजीराव कडिले यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीच्या दिशेने वाटचाल असणार्‍या राहुरी मतदारसंघात प्राजक्त तनपुरे यांना भाजपाची उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चांनी वेग आला आहे. मात्र, पायाला भिंगरी बांधल्यागत मतदारसंघ पिंजून काढणार्‍या अक्षय कर्डिले यांच्या बाजूने सहानुभूतीची मोठी लाट आजही कायम आहे. प्राजक्त तनपुरे यांना भाजपाने उमेदवारी दिली तरी अक्षय कर्डिले यांचा मोठा अडसर त्यांना असणार हे नक्की! राहुरी तालुक्यातील ६४ गावांमध्ये तनपुरे यांना मोठा विरोध आजही कायम आहे. भाजपाने उमेदवारी नाकारल्यास बंडाचे निशान अक्षयने फडकावल्यास आश्चर्य वाटू नये.

शरद पवार यांचा विश्वास तोडणार का?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव भाजपा प्रवेशाच्या अनुषंगाने चर्चेत आले आहे. त्यात तथ्य देखील आहे. मागील निवडणुकीत विजयी झाल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांना पाच- सहा खात्यांचे राज्यमंत्री पद मिळाले. त्यात त्यांचे मामाश्री जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली. त्याहीपेक्षा शरद पवार यांचा नगर जिल्ह्यातील विश्वासू तरुण आमदार म्हणून प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाहिले जात होते. आता तेच तनपुरे भाजपामध्ये प्रवेश करत असल्याच्या बातम्या आल्याने त्याचा सर्वाधिक त्रास शरद पवार यांना होणे स्वाभाविक आहे.

कर्डिलेंकडून पराभवाची तनपुरेंना आजही धास्ती!
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकतीच मुंबईत भाजप नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा झडत आहे. प्राजक्त तनपुरे हे आगामी काळात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. शिवाजीराव कर्डिले यांनी या मतदारसंघात तनपुरे पिता-पुत्र आणि त्यांच्या मातोश्री उषाताई यांचा पराभव केला होता. २०२४ ची निवडणूक शिवाजीराव कर्डिले यांनी मोठ्या मताधिक्याने जिंकली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाल्याने आता या मतदारसंघात पोट निवडणूक होत आहे. पोट निवडणुकीत अक्षय कर्डिले याच्याकडून पराभव चाखावा लागला तर तनपुरे यांचे राजकारणच संपुष्टात येण्याची भिती व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा :  गॅस दरवाढ विरोधात काँग्रेसचे आंदोलन, काय आहेत मागण्या पहा

स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांना डावलणे पडणार महागात!
राहुरीचे राजकारण कायमच तनपुरे विरुद्ध सारे असेच राहिले आहे. आता तनपुरे हे भाजपाकडून उमेदवार होणार असल्याच्या बातम्या समोर येत असताना त्यांच्या विरोधकांनी राजीनामास्त्र हाती घेतले असल्याचे दिसते. स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांनी तनपुरे यांना उमेदवारी देण्यासह पक्षात घेण्यास तीव्र नाराजी नोंदवली आहे. त्यांच्या नाराजीची दखल घेतली गेली नाही तर त्याचे पडसाद उमटू शकतात.

अक्षय कर्डिलेंच्या बाजूने तरुणाईसह सहानुभूतीची लाट!
राहुरी मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले यांनी कार्यकर्त्यांची उभारलेली जीवाभावाची फौज, केलेली विकास कामे आणि त्यात अक्षय कर्डिले यांना तरुणांनी दिलेली पसंती पाहता शिवाजीरावांच्या निधनाने निर्माण झालेली सहानुभूतीची लाट आजही कायम आहे. मतदारसंघात अक्षयने वाढवलेला संपर्क आणि त्याची काम करण्याची पद्धत आता गावागावात कौतुकाचा विषय ठरला आहे.

सुजय विखे पाटलांच्या भूमिकेकडे लागल्या नजरा!
मागील आठवड्यात विळद घाट येथे पत्रकारांशी संवाद साधताना भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी राहुरीतून अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीचे समर्थन केले होते. आता दोन दिवसांपूर्वी त्यांनी याबाबत सर्व्हे होईल आणि उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे म्हटले. या मतदारसंघावर विखे पाटलांची कमांड आहे हे नाकारता येणार नाही. कर्डिलेंच्या निधनानंतर अक्षयच्या संभाव्य राजकीय वाटचालीत त्याच्या सोबत राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. आता पोट निवडणूक जाहीर होत असल्याने विखे पाटलांच्या भूमिकेकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.

पक्षाचे चिन्ह टाळले तरी राहुरी पालिकेत काठावर पास!
राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याच्या सत्तेत पाच खात्यांचे राज्यमंत्री पद मिळाले असतानाही त्या पक्षाचे निवङणूक चिन्ह न घेण्याचा निर्णय प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी पालिकेच्या निवडणुकीत घेतला. हा निर्णय अनेकांना बचकाळ्यात टाकणारा ठरला. आघाडीच्या नावाखाली ती निवडणूक तनपुरे यांनी केली आणि पालिका ताब्यात घेतली. पालिकेतील एकूण मतांच्या गोळाबेरजेवर नजर मारली तर तनपुरे यांच्या विरोधात आजही राहुरी शहरात ४२ टक्के मतदार असल्याचे स्पष्टपणे समोर आले.

हे सुद्धा वाचा :  तनपुरेंना भाजपची खुली ऑफर; तनपुरेंनीही स्पष्टच सांगून टाकले...

अक्षयच्या उमेदवारीवर राहुरी शहरातील पदाधिकार्‍यांची भूमिका निर्णायक!
तनपुरे यांच्या संभाव्य भाजपा पक्षप्रवेशाला राहुरी शहरातील स्थानिक भाजप पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी अतिशय कडाडून विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात कार्यकर्त्यांची एक तातडीची बैठक पार पडली. या बैठ कीत उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी प्राजक्त तनपुरे यांना पक्षात घेण्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्याचा यथोचित सन्मान राखण्यासाठी त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांनाच या आगामी पोटनिवडणुकीत अधिकृत उमेदवारी देण्यात यावी, अशी ठाम आणि एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी केली. अक्षय कर्डिले यांना डावलून इतर कोणाला उमेदवारी दिली गेली तर पदांचे सामूहिक राजीनामे देण्याचेही जाहीर करण्यात आलेे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ