- जाहिरात -spot_img
breaking news

शाईफेक प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांची उडी, काय म्हणाले पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर किर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या साथीदारांनी आळंदी परिसरात गाठत अंगावर शाईच्या बाटल्या ओतल्या. तू गुरुवर्यांना बोलायचे नव्हते, ते आमचे सर्वस्व आहे, परत नादी लागू नको, असे म्हणत त्यांना धमकी देण्यात आली आहे. या शाईफेकीचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता संग्राम भंडारे यांनी केलेल्या कृत्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडून समर्थन करत त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

आ. जगताप म्हणाले की, मी हभप संग्राम बापू भंडारे यांचे अभिनंदन करतो आणि समर्थ देखील करतो. त्यांनी जे केले त्यामागची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. महाराष्ट्राची आणि देशाची एक वेगळी परंपरा आहे. या परंपरेमध्ये आपल्या धर्माची पताका घेऊन जात असताना अनेक लोकांनी आपलं संपूर्ण जीवन धर्माकरिता समर्पित केले आहे. त्यामुळे बापूंनी जे केलेले आहे, त्याचे आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करतो. त्यांनी अत्यंत योग्य भूमिका बजावली. या लोकांना हिंदू धर्माविरोधात बोलायला कोण सांगत हे देखील लोकांसमोर यायला हवं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, विकास लवांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांनी ‘एस’वर एक व्हिडीओ जारी करत घडलेला घटनाक्रम सांगितला आहे. वारकर्‍यातील नथुराम गोडसे अर्थात गुंड संग्राम भंडारे आणि काही १०/१५ गुंड व्हीलरमध्ये आले होते. आज माझे आळंदी मातोबाची (ता. हवेली) येथे प्रवचन संपल्यानंतर १० वाजता मी परतत असताना माझी गाडी अडवून माझ्या अंगावर शाई ओतली. मला धक्काबुक्की करत पिस्तूल दाखवला आहे. नंतर ते पळून गेले. त्या निषेधार्थ मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब माझ्यावर हल्ला करणार्‍या गुंडांचा कायदेशीर बंदोबस्त करावा. तोपर्यंत मी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे सत्याग्रह करत आहे, असे लवांडे यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा :  देशाची अन्नसुरक्षा, आर्थिक स्थैर्यासाठी कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची - राज्यपाल जिष्णू देव वर्मा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ