- जाहिरात -spot_img
breaking news

रॅम्पवर अपमानित; त्याच कृति सेननने जिंकला राष्ट्रीय पुरस्काराचा मान

मुंबई / नगर सह्याद्री –
बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली कृति सेनन आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या सहज अभिनयाने, आकर्षक व्यक्तिमत्त्वाने आणि मेहनतीच्या जोरावर कृतिने चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र आज ज्या यशाच्या शिखरावर ती पोहोचली आहे, त्यामागे अनेक संघर्ष आणि कठीण प्रसंग दडलेले आहेत. मॉडेलिंगच्या सुरुवातीच्या काळात तिला सर्वांसमोर अपमानास्पद प्रसंगालाही सामोरे जावे लागले होते. पण त्याच अनुभवातून तिने स्वतःला अधिक सक्षम बनवत पुढे राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारली.

27 जुलै 1990 रोजी जन्मलेल्या कृति सेननचे कुटुंब चित्रपटसृष्टीशी संबंधित नव्हते. तिचे वडील चार्टर्ड अकाउंटंट आहेत, तर आई प्राध्यापिका आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी कृतिने मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अनेक जाहिराती आणि फॅशन शोमध्ये ती सहभागी होत होती.

एका मुलाखतीत कृतिने आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक प्रसंग सांगितला होता. तिचा पहिला रॅम्प शो एका फार्महाऊसमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्या ठिकाणी जमिनीवर चिखल असल्यामुळे रॅम्पवर चालताना तिची सँडल मातीत अडकली. त्यामुळे तिची रॅम्प वॉक पूर्णपणे बिघडली आणि ती खूप घाबरली. या घटनेनंतर फॅशन शोच्या कोरिओग्राफरने सर्वांसमोर कृतिला जोरदार सुनावले. हा प्रसंग तिच्यासाठी अत्यंत वेदनादायक होता. सर्वांसमोर झालेल्या या अपमानामुळे ती भावूक झाली आणि तिच्या डोळ्यांत अश्रू आले. मात्र या अनुभवाने ती खचली नाही. उलट तिने अधिक मेहनत घेण्याचा निर्धार केला आणि स्वतःवरील विश्वास कायम ठेवला.

कृतिने अभिनय क्षेत्रात 2014 मध्ये तेलुगू चित्रपटातून पदार्पण केले. सुपरस्टार महेश बाबूसोबत तिने पहिला चित्रपट केला. त्याच वर्षी टायगर श्रॉफसोबत ‘हिरोपंती’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्याच चित्रपटात तिच्या अभिनयाचे कौतुक झाले आणि तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर कृतिने ‘दिलवाले’, ‘राब्ता’, ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छुपी’ अशा अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या. प्रत्येक चित्रपटात तिने वेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारत स्वतःची अभिनय क्षमता सिद्ध केली.

हे सुद्धा वाचा :  तेजश्री प्रधानचा 'मॅजिकल' लूक सोशल मीडियावर व्हायरल! शॉर्ट वनपीसमध्ये वेधलं चाहत्यांचं लक्ष

2021 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिमी’ हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटात तिने सरोगेट आईची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली. तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांसह समीक्षकांनीही भरभरून कौतुक केले. याच भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामुळे कृतिच्या अभिनयाला मोठी दाद मिळाली आणि ती बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्री म्हणून अधिक ठळकपणे समोर आली.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ