धनु : एखाद्याला मदत करूनही कृतघ्नपणाचा अनुभव येऊ शकतो. जुने आजार उद्भवू शकतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या.
मेष : आत्मविश्वास वाढेल आणि विविध कार्यात गती येईल. जवळच्या व्यक्तींचे व वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : फसव्या लोकांच्या आणि इतरांच्या जाळ्यात असं अडकवू नका. व्यावसायिक योजनांमध्ये संयम बाळगा.
मिथुन : नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक उन्नती होईल. मात्र, दैनंदिन कामात काही किरकोळ अडचणी येतील.
कर्क : प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. मित्रांसोबतचे संबंध दृढ होतील आणि मनासारख्या घटना घडल्याने मन प्रसन्न राहील.
सिंह : आर्थिक दृष्ट्या दिवस प्रतिकूल असू शकतो. अनावश्यक भीती किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
कन्या : व्यावसायिक प्रगती होईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
तुळ : आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी ठरेल. जबाबदाऱ्या वाढतील आणि एखादे अशक्य काम शक्य होईल.
वृश्चिक : अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. बचतीकडे लक्ष द्या. सरकारी किंवा कायदेशीर बाबींमध्ये नियमांचे पालन करा.
मकर : कामाचा ताबा वाढू शकतो, परंतु त्यानुसार परिणामही चांगले मिळतील.
कुंभ : नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. नोकरी आणि व्यापारात वातावरण अनुकूल राहील.
मीन : काही कामे सहज पूर्ण होतील तर काहींसाठी वाट पाहावी लागेल.










