- जाहिरात -spot_img
breaking news

राळेगणसिद्धीच्या तरुणांची ‌‘आरोग्यदायी वारी‌’; दररोज 50 किलोमीटर चालण्याचा संकल्प

श्री क्षेत्र पिंपळनेर येथून 8 जुलै रोजी प्रस्थान

पारनेर | नगर सह्याद्री
संत परंपरेतील भक्ती, निरोगी जीवनशैलीचा संदेश आणि युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीची जाणीव रुजविण्याच्या उद्देशाने राळेगणसिद्धीतील तरुणांनी सुरू केलेल्या ‌‘आरोग्यदायी वारी‌’ उपक्रमाचे यंदा तिसरे वर्ष आहे. दि. 8 जुलै रोजी श्री क्षेत्र पिंपळनेर येथून या वारीचे प्रस्थान होणार असून, सहभागी तरुण तब्बल 230 किलोमीटरचा पायी प्रवास करून श्रीक्षेत्र पंढरपूर गाठणार आहेत.

मागील सलग दोन वर्षे या युवकांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाने आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी यशस्वीपणे पूर्ण केली. या उपक्रमाला गावातील युवकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढता सहभाग लक्षात घेऊन यंदा वारीचा प्रारंभ श्री क्षेत्र पिंपळनेर येथून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहभागी सर्व तरुण निश्चित केलेल्या मार्गाने स्वतंत्रपणे पायी प्रवास करणार आहेत. या आरोग्यवारीत येथील 15 हून अधिक तगटणांनी सहभाग घेतला आहे. या वारीचे वैशिष्ट्‌‍य म्हणजे प्रत्येक सहभागी दररोज किमान 50 किलोमीटर पायी चालण्याचा संकल्प पूर्ण करणार आहे. श्रद्धा, शिस्त, चिकाटी आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून युवकांमध्ये नियमित व्यायाम, निरोगी जीवनशैली, व्यसनमुक्ती आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि समाजाप्रती सकारात्मक दृष्टिकोन
भक्तीबरोबरच आरोग्य जपण्याचा संदेश देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. अशा उपक्रमातून युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि समाजाप्रती सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल. सहभागी सर्व युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा.
– अण्णासाहेब हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

हे सुद्धा वाचा :  ... तर घरगुती गॅस सिलेंडर मिळणार नाही; महिन्याला एकाच सिलेंडर, पहा सविस्तर
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ