- जाहिरात -spot_img
breaking news

निवडणूक वादातून व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, काय घडलं पहा

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महानगरपालिका निवडणुकीच्या जुन्या वादातून एका बांधकाम व्यावसायिकावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडयाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना तपोवन रोड परिसरात घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सागर दत्तात्रय ढवण (वय ३८, रा. तपोवन रोड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अजय उर्फ विकी दिलीप ढवण, ऋषीकेश सुनील ढवण, सागर पोपट पोळ, मयूर सुरेश वुळ आणि विजू बहीरु शिंदे (सर्व रा. ढवण वस्ती, अहिल्यानगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर ढवण यांचे इंडो आयरीश हॉस्पिटल शेजारी नवीन बांधकाम सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी ढवण तिथे असताना सर्व आरोपी त्या ठिकाणी आले.

तुम्ही आम्हाला महानगरपालिका निवडणुकीत खूप त्रास दिला आहे, असे म्हणून आरोपींनी ढवण यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी जवळ असलेल्या लोखंडी रॉड व लाकडी दांडयाने ढवण यांना बेदम मारहाण केली. यावेळी विकी ढवण याने आपल्या गळ्यातील पंच्याने फिर्यादीचा गळा आवळून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ढवण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मॅककेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांनी पथकासह भेट दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  स्व. बाळासाहेब विखे यांचे दुष्काळमुक्तीचे स्वप्न पूर्ण करा : अण्णासाहेब हजारे
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ