- जाहिरात -spot_img
breaking news

सुपा एमआयडीसीत कंपनीला भीषण आग; मोठे नुकसान, काय घडलं पहा…

अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न | मोठे नुकसान
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीत आज भीषण आग लागल्याची घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुपा येथील घाणेगाव परिसरात असलेल्या व्यंकटेश प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ही आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनी प्लास्टिक उत्पादनाशी संबंधित असल्याने आगीने काही वेळातच भीषण स्वरूप धारण केले.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोयात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कंपनीतील मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाल्याची शयता वर्तवली जात आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, याच कंपनीत यापूर्वीही मागील बाजूस आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी आग नियंत्रणात आणण्यात यश आले होते. मात्र यावेळी लागलेली आग अधिक भीषण असून दुपारपर्यंतही ती पूर्णपणे आटोयात आलेली नव्हती.

या घटनेमुळे सुपा औद्योगिक वसाहतीतील इतर कंपन्यांमध्येही खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासन आणि अग्निशमन दल परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. या आगीमागील नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला असून शॉर्ट सर्किट, रासायनिक प्रतिक्रिया किंवा इतर तांत्रिक कारणांचा अंदाज वर्तवला जात आहे. एकंदरीत, ही घटना औद्योगिक सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.

हे सुद्धा वाचा :  पारनेर-नगर मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना गती
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ