- जाहिरात -spot_img

उसाला चांगला भाव, वेळेत पेमेंट  : नरेंद्र घुले पाटील

भेंडा | नगर सह्याद्री
गळितास आलेल्या उसाला चांगला भाव आणि वेळेत पेमेंट देण्याचे योग्य नियोजन करण्यात येईल अशी ग्वाही लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे अभिष्टचिंतन व कारखाना संचालक मंडळ बिनविरोध निवडणुकीचे शिल्पकार माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांचा ज्ञानेश्वर उद्योग समूह, कामगार संघटना व विविध संस्थाचे वतीने आयोजित सत्कार समारंभात घुले बोलत होते.

कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, तज्ञ संचालक डॉ. क्षितिज घुले पाटील, संचालक काकासाहेब नरवडे,बबनराव भुसारी, अशोकराव मिसाळ, पंडितराव भोसले, डॉ.नारायण म्हस्के, जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, जनार्दन कदम, प्रसाद पटारे, मच्छिंद्र म्हस्के, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, दत्तात्रय काळे, बाळासाहेब खरड, संतोष पावसे, विकास नन्नवरे, अमोल अभंग, ॲड. हिम्मतसिंह देशमुख, रविंद्र नवले, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, जनरल मॅनेजर रवींद्र मोटे व्यासपीठावर उपस्थित होते.

नरेंद्र घुले पाटील म्हणाले की, संघटनेवर विश्वास ठेवून अर्ज मागे घेतलेल्या सहकार्यांमुळे हे निवडणूक बिनविरोध झाली. सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्या सूचना व कल्पना विचारात घेऊन मार्गक्रमण करू. संपूर्ण आशिया खंडात एल निनोचे संकट आहे. या नैसर्गिक अडचणीतून मार्ग काढत ऊस उत्पादन वाढीसाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे. पांडुरंग अभंग, काकासाहेब नरवडे, अनिल शेवाळे यांनी ही मनोगत व्यक्त करून घुलेंना शुभेच्छा दिल्या. माजी संचालक जनार्दन पटारे, बाळासाहेब नवले, विष्णूपंत जगदाळे, अजित मुरकुटे, डॉ. शिवाजी शिंदे, अशोक वायकर, नामदेव निकम, बबनराव धस, तांत्रिक सल्लागार एम. एस. मुरकुटे, एस.डी. चौधरी, महेंद्र पवार, मुख्य अभियंता राहुल पाटील, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, नंदकिशोर पाटील, प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे आदी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  डिजिटल पद्धतीने होणार जनगणना - २०२७ ; प्रक्रिया होणार दोन टप्प्यांत पूर्ण
Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com