- जाहिरात -spot_img
breaking news

अहिल्यानगरमध्ये शिंदेसेना नेत्यावर गोळीबार; नेम चुकल्यामुळे थोडक्यात बचावले, काय घडलं पहा…

श्रीरामपूर / नगर सह्याद्री –
श्रीरामपुरात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेते प्रशांत कहाणे यांच्यावर गोळीबार झाल्याची चर्चा होत आहे. या घटनेमुळे श्रीरामपुरात खळबळ उडाली आहे. ही गोळीबाराची घटना मागील काही वादातून घडल्याचे बोलले जात आहे.

मध्यरात्री श्रीरामपुरात येथील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यात नेम चुकल्यामुळे प्रशांत कहाणे थोडक्यात बचावले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण श्रीरामपूर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी गाडीतून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने थेट गोळीबार केला. चालत्या गाडीवर हा गोळीबार करण्यात आला, मात्र हल्लेखोरांचा नेम चुकल्याने मोठी दुर्घटना टळली आणि कहाणे सुरक्षितपणे बचावले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या भागाची पाहणी केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. भररस्त्यात राजकीय पदाधिकाऱ्यावर झालेल्या या गोळीबारामुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

हे सुद्धा वाचा :  पारनेरच्या ३५ गावांना मिळणार दिलासा; आमदार दाते यांच्या पाठपुराव्याला यश
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ