- जाहिरात -spot_img
breaking news

अखेर मान्सून दाखल, ‘या’ तारखेपर्यंत पेरणी करूच नका; काय आहे हवामान विभागाचा सल्ला

नागपूर / नगर सह्याद्री –
गेल्या काही दिवसांपासून चातकासारखी वाट पाहायला लावणाऱ्या मान्सूनचे अखेर विदर्भात आगमन झाले आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळालाय. तर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, हवामान विभागाने शेतकऱ्यांना पेरणीबाबत एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

विदर्भात मान्सून १० दिवस उशिराने; ‘या’ जिल्ह्यांत हजेरी
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा विदर्भात मान्सून पोहोचायला सुमारे १० दिवसांचा विलंब झाला आहे. अखेर मान्सून विदर्भात दाखल झाला असला, तरी त्याने अजून पूर्ण विदर्भ व्यापलेला नाही. सध्या विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे. पुढील २ ते ३ दिवसांत मान्सून उर्वरित विदर्भही व्यापेल. तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया या भागातही पुढील काही दिवसांत मान्सून दाखल होईल.

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई करू नका
हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. मान्सून दाखल झाला असला, तरी सुरुवातीला पावसामध्ये काही दिवसांचा खंड पडू शकतो. २८ जूननंतर मान्सूनचा दुसरा टप्पा सक्रिय होईल. त्यामुळे जोपर्यंत शेतात किमान ७० ते १०० मिमी पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये; अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते.

नाशिकमध्ये यलो अलर्ट; तापमानात घट
दुसरीकडे, नाशिक शहर आणि ग्रामीण भागातही मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनामुळे नाशिकमधील कमाल तापमानात मोठी घट झाली असून वातावरण आल्हाददायक झाले आहे. हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्याला पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला असून, घाटमाथा परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नाशिककर सध्या दमदार पावसाची प्रतीक्षा करत असून शेतकरी वर्ग सुखावला आहे.

सध्या महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बराचसा भाग, तसेच मुंबई आणि पुणे हा परिसर मान्सूनने व्यापला आहे. पुढील ६ ते ७ दिवस पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस राहील, तर पूर्व आणि पश्चिम विदर्भात सामान्य ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :  राज्यसभा गाजवली, देशभर चर्चा, पण तरीही आपची राघव चड्डांवर कारवाई; नेमकं कारण काय?

पुढील 5 दिवस धोक्याचे… अतिवृष्टीचे ढग तयार; राज्याच्या या भागाला अलर्ट जारी, समुद्रही खवळणार
राज्याच्या काही भागात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. अशातच आता हवामान विभागाने कोकणासह अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे 24 ते 28 जून या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

कोकणात मुसळधार पावसाची हजेरी
आज सकाळपासून रत्नागिरीसह कोकणाच्या विविध भागात पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू आहे. कारण अरबी समुद्र आणि किनारपट्टी भागात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. किनारपट्टी भागात अतिवृष्टीचे ढग तयार झाले आहेत. त्यामुळे गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 46 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. तर रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 91 मिलिमीटर पाऊस पडला, तर गुहागर तालुक्यात 76 मिलिमीटर पाऊस पडला. आता अरबी समुद्र किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच आज आणि उद्या दोन दिवस समुद्र देखील खवळलेला असणार आहे. त्यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरीला पावसाचा येलो अलर्ट
रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला आहे कारण रखडलेला मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. किनारपट्टी भागात अतिवृष्टीचे ढग तयार होण्यास सुरवात झाली असल्याने 24 ते 28 जून दरम्यान अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भात मान्सून दाखल
गेल्या काही दिवसांपासून रखडलेला मान्सून अखेर विदर्भात दाखल झाला आहे. मात्र अद्यापही मान्सूनने पूर्ण विदर्भ व्यापलेला नाही अशी माहिती नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. सध्या मान्सून गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाला आहे, आता पुढील दोन ते तीन दिवसांत तो पूर्ण विदर्भ व्यापणार आहे.

हे सुद्धा वाचा :  वाईन शॉप स्थलांतरास संगमनेरमध्ये विरोध....

पुढील आठवडाभर पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदा विदर्भात मान्सून पोहचायला सुमारे 10 दिवसांचा विलंब झाला आहे. 8 ते 21 जून पर्यंत मान्सूनची प्रगती थांबली होती. त्यावर अल निनोचा प्रभाव होता. त्यामुळे अनुकूल परिस्थिती तयार होत नव्हती मात्र आता मान्सून पुढे सरकल्याचे समोर आले आहे. सध्या मान्सून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बराचश्या भागात दाखल झाला आहे. आता पुढील 6 ते 7 दिवस पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व आणि पश्चिम विदर्भात सामान्य ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ