- जाहिरात -spot_img
breaking news

​स्वस्तिक बसस्थानकात एसटी वाहकास मारहाण; काय घडलं पहा

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल
​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
येथील स्वस्तिक बसस्थानकामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकास मारहाण झाल्याची घटना घडली. बस उभी करताना इशारा देणाऱ्या वाहकास शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​१ मार्च रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास बसस्थानकामध्ये ही घटना घडली.

चालक बस उभी करत असताना, महिला वाहक खाली उतरून त्यांना इशारा देत होत्या. यावेळी तिथे आलेल्या किसन रामकिसन धनवटे याने बसबाबत विचारणा केली. वाहकाने काही क्षण थांबण्यास सांगितले असता, त्याला राग अनावर झाला.

​संबंधित इसमाने महिला वाहकाला अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नाही तर, त्याने महिलेचा शर्ट पकडून हाताने मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. उपस्थित सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करून मारहाण करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी किसन धनवटे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  पाणी टंचाई, प्रशासन अलर्ट, टँकर प्रस्ताव तातडीने पाठवा; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ