कांकरिया दाम्पत्याने पडीक जमिनीवर वनराई फुलवली हे नक्कीच कौतुकास्पद ः कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
येथील एमआयडीसीच्या पाठीमागे असलेले डॉ. कांकरिया यांच्या साईबन कृषी पर्यटन केंद्रास महाराष्ट्राचा कृषिरत्न पुरस्कार प्राप्त झाला असून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हा पुरस्कार साईबनचे संचालक डॉ. सौ. सुधा व डॉ. प्रकाश कांकरिया यांनी पुणे येथील यशदाच्या सभागृहात समारंभपूर्वक स्वीकारला. या कार्यक्रमाचे आयोजन दैनिक सकाळ चे अॅग्रोवन यांच्या वतीने करण्यात आले होते.
सुरुवातीस कृषिमंत्री भरणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महाराष्ट्राचे कृषिरत्न कॉफीटेबल बुकचे प्रकाशन झाले. या प्रसंगी अॅग्रोवनचे कार्यकारी संपादक रमेश जाधव, महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, ‘यशदा’ चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड उपस्थित होते. या प्रसंगी कृषिमंत्री श्री. भरणे म्हणाले की, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसिद्ध करणारा ‘अॅग्रोवन’ कृषी क्षेत्रातील उद्योजकांसाठीही पुढाकार घेतोय. ही बाब कौतुकाची असून महाराष्ट्राचे ‘कृषिरत्न’ उपक्रमातून उद्योजकांना प्रेरणा मिळेल. कृषी उद्योजकांनी ज्ञान संशोधनाचा विस्तार करावा. डॉ. कांकरिया यांच्या हॉस्पिटलमध्ये 25 वर्षांपूव मला जाण्याचा योग आला होता. प्रचंड अशी गद होती. पण यामधूनही वेळ काढून डॉ. कांकरिया दाम्पत्याने पडीक जमिनीवर वनराई फुलवली ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. मी त्यांच्यासहित सर्व कृषिरत्नांचे अभिनंदन करतो.
या प्रसंगी पुरस्काराथच्या वतीने डॉ. सुधा कांकरिया यांनी मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, साईबन हे एक पडीक जमिन विकासाचे आदर्श मॉडेल आहे. एमआयडीसीच्या सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्यावर विकास केला आहे. हजारो झाडे लावली, जगवली, वाढवली व त्यातून ही वनराई फुलवली आहे. महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कारही साईबनला प्राप्त झाला आहे. कृषी क्षेत्रातील नामवंत अण्णा हजारे, मोहन धारिया, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंहज यांचे मार्गदर्शन लाभले, विज्ञानाचे विद्याथ असल्यामुळे तोच दृष्टिकोन करताना आला. पुढच्या प्रवासात पद्मश्री पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन लाभले व साईबन हा वैज्ञानिक दृष्टी असलेले कृषी पर्यटन केंद्र बनले. साईबन कृषी पर्यटन केंद्राद्वारे इतर सोईंबरोबरच बालवयातच वृक्षसंस्कार, वृक्षसंवर्धन ही मूल्ये रुजवली जातात. पर्यटकांसाठी बोटिंग, पपेट शो, झीप लाईन, नक्षत्र उद्यान, विविध खेळणी, कारंजे, सूर्योदय, सूर्यास्ताचे विलोभनीय फोटो पॉइंट, मेडिटेशनची पहाडी, बटरफ्लाय गार्डन, पीस पार्क, सहित रुचकर-शुद्ध-शाकाहारी भोजनाचीही सुंदर सुविधा उपलब्ध आहे.
सुरुवातीस अॅग्रोवनचे संपादक रमेश जाधव यांनी स्वागत केले. कृषी उद्योजकांना वेळेत व पुरेसे कर्ज देणार असे महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी जाहीर केले. आर्थिक कोंडीमुळे शेतकरी अडचणीत आला. त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे असे यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड म्हणाले. शेवटी अॅग्रोवनचे सहायक संपादक अमित गद्रे यांनी आभार मानले.










