- जाहिरात -spot_img
breaking news

कानिनाथ यात्रेसाठी मढीत जय्यत तयारी; रोषणाईने उजळले चैतन्य कानिफनाथ मंदिर

सीसीटीव्ही, ड्रोन, मुक्तद्वार दर्शनासह सर्वांगीण नियोजन
पाथर्डी | नगर सह्याद्री

श्री क्षेत्र मढी येथे होणार्‍या चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा महोत्सवासाठी नूतन विश्वस्त मंडळाने अवघ्या एका महिन्यात व्यापक आणि नियोजनबद्ध तयारी पूर्ण केली असून ८ मार्चपासून सुरू होणार्‍या या यात्रेसाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. दि. ११ ते १७ मार्च या कालावधीत मुक्तद्वार दर्शनाची सुविधा ठेवण्यात आली आहे. दि. १८ मार्च रोजी फुलबाग यात्रेदिवशी समाधी मंदिरात केवळ कावडधारकांना प्रवेश दिला जाणार आहे. आठ मार्च रोजी रंगपंचमी हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने लाखो लोक दर्शनासाठी मढी येथे येत असल्याने प्रशासनासह विश्वस्त मंडळाने जय्यत तयारी केली आहे.

मंदिर व परिसरात सध्या ७२ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून पोलिस प्रशासनासाठी स्वतंत्र ३२ कॅमेर्‍यांची सुविधा बसविण्यात येत आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन ड्रोन कॅमेर्‍यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर व दर्शन रांगेचे स्ट्रकचरल ऑडिट करण्याची कार्यवाही सुरू आहे.नवीन विश्वस्त मंडळाची निवड जानेवारीत होऊन प्रलंबित कामे मार्गी लावत यात्रेचे नियोजन वेगाने पूर्ण करण्यात आले आहे. वाढत्या भाविकांच्या संख्येचा विचार करून सुरक्षेला, स्वच्छतेला आणि वाहतूक नियंत्रणाला प्राधान्य देण्यात आल्याची माहिती कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल मरकड यांनी दिली.

अग्निसुरक्षेसाठी अग्निशमन गाडीबरोबरच ४० फायर एस्टिंग्विशर उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका सज्ज असून, आरोग्य विभागाच्या समन्वयातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहणार आहेत.२० हजार चौ. फुटांचा हॉल, स्वतंत्र डायनिंग हॉल, किचन, निवारा हॉल, स्वच्छतागृहे आणि पक्की पार्किंग व्यवस्था उपलब्ध ठेवण्यात आली आहे. १३ खोल्यांचा भक्तनिवासही भाविक व स्वयंसेवकांसाठी खुला राहणार आहे.यात्रा कालावधीत गावठाण व शेतीपंपासाठी अखंड वीजपुरवठा व्हावा यासाठी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून तयारी करण्यात आली आहे. कचरा डेपो, कचरा वाहतूक गाडी, ड्रेनेज लाईन पूर्णत्वास नेण्यात आली आहे. अहिल्यानगर महापालिका व मढी ग्रामपंचायतीमार्फत फिरते शौचालय उपलब्ध राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा :  रविराज साबळे यांच्यावरील गुन्हा मागे घ्या

पशुहत्या बंदी व डीजे बंदीबाबत जनजागृतीसाठी फ्लेस व लाउडस्पीकरद्वारे सूचना दिल्या जाणार आहेत. अन्न व औषध प्रशासनामार्फत खाद्यपदार्थांची तपासणी होणार आहे.दि. ११ ते १७ मार्च या कालावधीत मुक्तद्वार दर्शनाची सुविधा ठेवण्यात आली आहे. दि. १८ मार्च रोजी फुलबाग यात्रेदिवशी समाधी मंदिरात केवळ कावडधारकांना प्रवेश दिला जाणार आहे. या सर्व नियोजनात आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांचे प्रमुख अधिकारी यांचे सहकार्य लाभले आहे.देवस्थान ट्रस्टतर्फे भाविकांना निर्धारित वाहनतळाचाच वापर करावा, ओव्हरस्पीड टाळावे, मंदिर परिसरात धूम्रपान करू नये तसेच ट्रस्टच्या नावाखाली होणार्‍या अनधिकृत वसुलीपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नाथ पालख्या व निशाण मिरवणुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही आवाहन ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.अध्यक्ष विठ्ठल मरकड, उपाध्यक्ष सूरसिंगराव पवार, माधुरी मरकड, अनिल साठे, दादासाहेब मरकड, महादेव कोकाटे, उत्तम मरकड, अ‍ॅड. तानाजी धसाळ, तानाजी शिंदे, मदन मरकड, उषा मरकड या विश्वस्तासह मुख्य कार्यकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड व सर्व कर्मचारी यात्रा नियोजनासाठी परिश्रम घेत आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोेजना
धामणगाव रस्त्यालगत ३८ एकर जागेत एसटी व चारचाकी वाहनतळ, छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ २.५ एकर जागेत दुचाकी वाहनतळ, निवडुंगे रोडलगत ४ एकर जागेत चारचाकी वाहनतळ, श्रीराम चौकाजवळ दुचाकी वाहनतळ, मंगल कार्यालय परिसरात अस्थानधारकांसाठी पार्किंग यासोबतच बायपास रस्त्यांची दुरुस्ती करून पर्यायी मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. निवडुंगा मार्ग येण्यासाठी, तिसगाव मार्ग बाहेर जाण्यासाठी, पाथर्डी धामणगाव-मढी मार्ग दुहेरी वाहतूक, मायंबा घाट फक्त दुचाकी वाहनांसाठी असणार आहे. एस.टी. स्टँड धामणगाव रस्त्यालगत हलविला आहे.

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ