- जाहिरात -spot_img
breaking news

जेलमध्ये आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळ्यावर केले ब्लेडने वार

पारनेर ग्रामीण रुग्णालयात आरोपीवर उपचार
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका परप्रांतीय आरोपीने स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १३) सकाळी घडली. या घटनेमुळे जेल प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, सुदैवाने जखमा गंभीर नसल्याने अनर्थ टळला आहे.

निघोज येथील एटीएम फोडी प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी संदीप भजन सिंग (वय २२, मूळ रा. पंजाब) हा सध्या पारनेर जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. सोमवारी सकाळी ११.१५ च्या सुमारास त्याने अचानक स्वतःकडे असलेल्या ब्लेडसारख्या धारदार शस्त्राने स्वतःच्या गळ्यावर सात ते आठ वार केले. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या संदीपला पाहून कारागृह कर्मचार्‍यांची धावपळ उडाली. त्याला तातडीने पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.पारनेर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गळ्यावर वार केले असले तरी जखमा फार खोलवर नव्हत्या. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याने दुपारी त्याला पुन्हा कारागृहात रवाना करण्यात आले आहे. मात्र, जेलमध्ये आरोपीकडे ब्लेड आले कोठून, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

निघोज (ता. पारनेर) येथील बसस्थानक परिसरातील एसबीआय बँकेचे एटीएम २१ मार्च रोजी रात्री फोडण्याचा प्रयत्न झाला होता. चोरट्यांचा हा प्रयत्न फसला असला, तरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या चार दिवसांत पारनेर पोलिसांनी संदीप भजन सिंग याला अटक केली होती.

याप्रकरणी संकेत चंद्रशेखर वैद्य (रा. नाशिक) यांनी फिर्याद दिली होती. अटकेनंतर संदीप सध्या न्यायालयीन कोठडीत असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने कारागृहातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलीस प्रशासन या आत्महत्येच्या प्रयत्नाचा अधिक तपास करत आहे.

जेलरकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
या घटनेबाबत विचारणा केली असता या आरोपीने पँटच्या चैन निप्पलने हा प्रकार केला असल्याची माहिती जेलरने दिली. वास्तविक पाहता आरोपीच्या गळ्यावर ६ ते ७ ब्लेडचे वार असून जेलमध्ये ब्लेड गेले असे ? वा कुणी पाठविले याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा :  धोकादायक वळणाने प्रवाशांचे जीव धोक्यात.. कुठे आहे वळण

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ