आमदार प्राजक्त तनपुरेंची लक्षवेधी
राहुरी | नगर सह्याद्री
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, कुरणवाडी, मिरी, तिसगाव, मुसळवाडी, बुऱ्हाणनगरसह अनेक प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची दुरवस्था आणि त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निधीची कमतरता हा गंभीर प्रश्न आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लक्षवेधीद्वारे विधीमंडळात मांडला.
राज्यातील बहुतांश प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांच्या नियमित देखभाल व संचालनावर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच शासनाने याबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. आ. तनपुरे म्हणाले की, राहुरी मतदारसंघातील अनेक योजना जीर्णावस्थेत असून, पूव वीजबिलावर मिळणारा 50 टक्के परतावा बंद झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे संबंधित राज्यमंत्री मेघना साकोरे-बोडकर यांनी शासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट केले. राज्य शासनाने ’ऑपरेशन अँड मेंटेनन्स-2026’ हे नवीन धोरण तयार केले असून, त्याअंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल, दुरुस्ती आणि नियमित संचालनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे मंत्र्यांनी सभागृहात सांगितले.










