- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य १३ मे २०२६

आजचे राशी भविष्य १३ मे २०२६

मेष
कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही -इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणाºया समस्या सोडवू शकाल.

मिथुन
आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल.घरातील इलेक्ट्रोनिक वस्तू खराब होण्याच्या कारणाने धन खर्च होऊ शकते. पत्नीबरोबर खरेदी करणे आनंददायी ठरेल. एकमेकांना समजून घेणे आणि त्यानुसार वागणे यात वाढ होईल. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळेल.

सिंह
मानसिक भीतीने घाबरून जाल. सकारात्मक विचार आणि उजळ बाजू विचारात घेतली तर भीती दूर लोटू शकाल. आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनामुळे तुम्ही मोहरून जाल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.

तुळ
भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला सोडावे लागतील. कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम करतात. अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा.

धनु
प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. रंजक गोष्टींच्या मागे धावू नका, सत्यस्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा. मित्रांबरोबर अधिक वेळ घालवा, ते तुमच्यासाठी फायद्याचे असेल. जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा.

कुंभ
तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. परंतु, चिंता करण्याचे कारण नाही – कारण निराशेपेक्षा आनंद-समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. मित्रांकडून तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला अधिक आधार मिळू शकेल. आज तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काही ही फरक पडणार नाही.

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य १४ जून २०२६

वृषभ
दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेऊ नका.

कर्क
जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहे त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. विना कुठल्या पूर्व सूचनेने आज तुमचा कुणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो.

कन्या
धावपळीचा दिवस असला तरी ऊर्जा टिकून राहील. जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. आपल्या करिअरसंबंधी निर्णय स्वत:च घ्या, त्यांचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनांमुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक
आज तुमचा विश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडेदेखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी इतरांचे नेतृत्त्व करा, तुमचा प्रामाणिकपणा काम करण्याच्या पद्धतीमुळे तुमची प्रगती होईल.

मकर
रात्रीच्या वेळी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. नातेवाईक/मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका.

मीन
सुखी आयुष्यासाठी, वेळेचा निव्वळ व्यय करणा-या हट्टी स्वभावाचा त्याग करा. जे लोक आत्तापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते आज त्यांना समजेल की, पैश्याची आयुष्यात किती आवश्यकता आहे कारण, आज अचानक तुम्हाला पैश्याची आवश्यकता असू शकते आणि तुमच्या जवळ पर्याप्त धन नसेल. इतरांच्या कामात नाक खूपसणे टाळा .

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ