- जाहिरात -spot_img
breaking news

जामखेड तापले; पारा ४२ अंशांवर, दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट

सकाळपासूनच उन्हाचे चटके : उष्णतेने जनजीवन विस्कळीत
जामखेड | नगर सह्याद्री
तालुक्यासह परिसरात उष्णतेची तीव्रता पुन्हा वाढली असून, मंगळवारी (दि. १२) कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. सकाळपासूनच कडक उन्हाचे चटके जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत उष्ण वार्‍यांचा तडाखा वाढल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार सुरू असतानाच आता उन्हाचा पारा पुन्हा वाढू लागला आहे. शहरासह ग्रामीण भागात दुपारच्या सुमारास उकाड्यात मोठी वाढ झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. शेतकरी, मजूर, दुचाकीस्वार, फेरीवाले तसेच प्रवाशांना उष्णतेचा मोठा फटका बसत आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने दि. १३ ते १४ मे रोजी म्हणजे पुढील दोन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शयता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे तसेच उष्माघातापासून बचावासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे थंड पेये, लिंबूपाणी, ताक, ऊसाचा रस तसेच कलिंगड, खरबूज यांसारख्या फळांना मोठी मागणी वाढली आहे. शहरातील ज्यूस सेंटर आणि थंड पेयांच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी वाढल्याचे दिसून आले.दरम्यान, वाढत्या तापमानामुळे वीज वापरातही वाढ झाली असून काही भागांत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. उष्णतेमुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

आरोग्यावर परिणाम होण्याची भीती
कडक उन्हामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणार्‍या कामगारांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. उष्माघात, डोकेदुखी, चक्कर येणे, अंगात अशक्तपणा जाणवणे, शरीरातील पाण्याची कमतरता अशा तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे डॉटरांनी सांगितले. नागरिकांनी दुपारच्या वेळेत शयतो बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि हलका आहार घ्यावा, असा सल्लाही वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट
उष्णतेच्या तीव्रतेमुळे दुपारच्या वेळेत जामखेड शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर तसेच प्रमुख चौकांमध्ये नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेकांनी सकाळीच कामे उरकून दुपारी घरात राहणे पसंत केले.

हे सुद्धा वाचा :  जुने दहिफळ येथे जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा...कोणाला केली अटक
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ