अहिल्यानगर | नगर सह्याद्री
मित्रबाहेर गेलेल्या किंवा दिवंगत झालेल्या मित्राचा फोटो इन्स्टाग्रामवर स्टेटस म्हणून ठेवल्याच्या कारणावरून एका तरुणाला फोन करून अलील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार अहिल्यानगरमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्जेपुरा येथील कौलारू कॅम्प परिसरात राहणारा 18 वषय तरुण आदेश भरत भागानगरे हा फिटर म्हणून काम करतो. आदेश आणि त्याचा मित्र अलीम तन्वीर शेख हे दोघे जण चांगले मित्र आहेत. अलीम याचा भाऊ अकवान तन्वीर शेख याचा मृत्यू झालेला असल्याने, आदेशने आपल्या मित्राच्या दिवंगत भावाचा फोटो आदरांजली किंवा आठवण म्हणून आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर स्टेटस म्हणून ठेवला होता. हा स्टेटस पाहिल्यानंतर मुकुंदनगर भागात राहणारा आरोपी जक्की वसीम शेख याला या गोष्टीचा प्रचंड राग आला.या कारणावरून आरोपी जक्की शेख याने थेट आदेश भागानगरे याला फोन केला आणि इन्स्टाग्रामवर फोटो स्टेटस का ठेवला, अशी विचारणा करत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपीने आदेशला फोनवरच अत्यंत वाईट आणि अलील भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता त्याने आदेशला थेट जिवे मारण्याची धमकी दिली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या धमकीनंतर आदेश भागानगरे याने तातडीने तोफखाना पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपी जक्की वसीम शेख याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव करत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
अहिल्यानगरः मागील तक्रार मागे घेण्यासाठी एका महिलेला बोलावून घेऊन, तिच्याशी लग्न करण्याचे खोटे आमिष दाखवत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक विश्वनाथ जावळे (रा. रानमळा मंठा, जिल्हा जालना) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडित महिला ही 23 वर्षांची असून ती खाजगी नोकरी करते. आरोपी दिपक याने पीडित महिलेला सावेडी नाका भागातील एका शाळेच्या पाठीमागे असलेल्या अपार्टमेंटमध्ये बोलावून घेतले होते. तू माझ्याविरुद्ध केलेली जुनी तक्रार मागे घे, मी तुझ्याशी लग्न करेन असे खोटे आमिष महिलेला दिले. त्यानंतर पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यास पीडितेने विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने पिडितेस मारहाण केली. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी आरोपी दिपक जावळे याच्याविरुद्ध मारहाण, धमकी आणि अत्याचाराच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एकसिंगे आणि महिला सहायक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण करत आहेत.










