सिंह : नोकरी आणि व्यवसायात कामाचे प्रमाण वाढेल. जिद्द आणि चिकाटीमुळे कठीण प्रसंगांवर मात कराल.
मेष : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील आणि तुमची प्रगती होईल。
वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढू शकते आणि पैसे वाया जाण्याची शक्यता असल्याने सावध राहा。
मिथुन : बुध ग्रहाच्या मार्गी चालण्यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन आत्मविश्वास वाढेल. अतिउत्साहात घाईघाईने कामे करणे टाळा.
कर्क : घरातील लहान-मोठे वाद मिटतील आर्थिक गुंतवणुकीपूर्वी सखोल संशोधन करा.
कन्या : जुनी येणी वसूल होण्याचा योग आहे。व्यवसायात नवीन तंत्रज्ञान अमलात आणू शकाल कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि वर्चस्व राहील。
तुळ : कौटुंबिक बाबींना प्राधान्य द्याल。नोकरदार वर्गासाठी दिवस दिलासादायक असून मन:शांती लाभेल आरोग्याची स्थिती उत्तम राहील。
वृश्चिक : आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता मजबूत राहील. वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीचे योग जुळून येतील。
धनु : आर्थिक व्यवहारांमध्ये पूर्ण खबरदारी बाळगा. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील आणि अनेकांचे सहकार्य लाभेल.
मकर : कार्यक्षेत्राचा विस्तार होण्याची शक्यता असून मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल。नोकरदारांना दिलासा मिळेल आणि आर्थिक बाजू सावरता येईल。
कुंभ : तुम्हाला काही महत्त्वपूर्ण बातम्या समजतील. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील आणि आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील。
मीन : अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. अपेक्षित यश मिळवण्यासाठी कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या प्रयत्नांवर भर द्या。










