- जाहिरात -spot_img
breaking news

मतदारयादी विशेष पुनरावलोकन मोहिमेच्या माध्यमातून विरोधी मतदारांची नावे गायब करण्याचे षड्यंत्र ः काळे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सध्या महाराष्ट्रासह देशातील २२ राज्यांमध्ये मतदारयादी विशेष पुनरावलोकन मोहीम (एसआयआर) राबवली जात आहे. विरोधी मतदारांची नावे गायब करण्यासाठीच हे सत्ताधार्‍यांचे देशविरोधी षडयंत्र आहे. एसआयआर ही वोट चोरीची योजना आहे. निवडणूक आयोग आता वोट चोरी षडयंत्राचा सक्रिय भागीदार बनला असून हा लोकशाही वरील हल्ला असल्याचा आरोप, ठाकरे शिवसेनेचे महानगरप्रमुख किरण काळे यांनी केला आहे. आपली नावे गायब होणार नाहीत या साठी मॅपिंग करून घेत मतदारांनी जागरूक रहावे, असे आवाहन काळे यांनी केले आहे.

अहिल्यानगर शहरातील मतदारांची यादीतील नावे सुरक्षित व अबाधित राहण्यासाठी जनजागृती अभियान विरोधकांच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. त्याच्या शुभारंभ प्रसंगी काळे बोलत होते. यावेळी संजय झिंजे, मनोज गुंदेचा, विलास उबाळे, अनिस चुडीवाला, अनंत गारदे, रावजी नांगरे, पै. दीपक भोसले, सुशांत म्हस्के, प्रतीक बारसे, राम वाणी, राम झिने, प्रा. अमोल खाडे, रोहन शेलार, मतीन शेख, विकेश गुंदेचा, गणेश आपरे, शंकर आव्हाड, नलिनी गायकवाड, नीता बर्वे, अर्चना गायकवाड, शारदा वाघमारे, उषा भगत, शैला लांडे, रजनी ताठे, मीना रणशूर, रूपाली आपरे, लोकेश बर्वे, विजय शिरसाठ, चंद्रकांत उजागरे, जयराम आखाडे, विनोद शिरसाट, राम धोत्रे, सोनू देशमुख, आकाश अल्हाट, विकास भिंगारदिवे, नीलेश लांडे, अप्पासाहेब लांडगे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

किरण काळे म्हणाले, एसआयआर प्रक्रिया घाईघाईने आणि नियोजित रीतीने राबवली जात आहे. ज्यामुळे खर्‍या मतदारांचे, विशेषतः गरीब, दलित, ओबीसी, अल्पसंख्याक आणि स्थलांतरित नावे यादीतून काढली जात आहेत. जी मतं सत्ताधार्‍यांच्या विरोधात पडतात ती हेरून वगळली जात आहेत. ही मत चोरीला झाकण्यासाठीची योजना आहे. निवडणूक आयोग दबावाखाली काम करत आहे. ही मोहीम म्हणजे मतदारयादी स्वच्छ करण्याचे नाव आहे, पण प्रत्यक्षात खर्‍या मतदारांना वंचित ठेवण्याचे षडयंत्र आहे. आपली नावे मतदारयादीत अबाधित राहण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहावे. मॅपिंग करून घ्यावे. आपल्या केंद्राच्या बीएलओशी संपर्क साधावा. या प्रक्रियेत काही अडचणी आल्यास मतदारांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन काळे यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा :  संभाजी महाराजांचे शौर्य, राष्ट्रप्रेम प्रेरणादायी ः महापौर गाडे

अनेकांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्य मिळाल. त्यानंतर संघराज्य पद्धतीने लोकशाही आधारित संसदीय प्रणाली देशाने स्वीकारली. मात्र महिला आरक्षणाचा बागुलबुवा उभा करून लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचे षडयंत्र आखलं होतं. मात्र देश तोडण्याचे हे षडयंत्र विरोधी पक्षांनी मोडून काढलं. महिला अत्याचाराचे हथरस, उन्नाव प्रकरण, मणिपूर मध्ये महिलांची नग्न धिंड, महिला खेळाडूंवर अत्याचार होत असताना नारीशक्तीचा ढोंगी दिंडोरा वाजवणारे मूग गिळून गप्प का होते? घरगुती गॅस तुटवड्यामुळे आजही अनेक माताभगिनींना मोठ्या त्रासाचा सामना करत आहेत. लाडया बहीण योजनेची मदत वारंवार वेळेत मिळत नाही. योजना बंद पडायच्या मार्गावर आहे. मात्र मनुवादाचे पुरस्कर्ते असणारे महिलाविरोधी सरकारचे षडयंत्र विरोधी पक्षांच्या एकजुटी मुळे फसले असल्याचे प्रतिपादन, किरण काळे यांनी यावेळी केले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ