- जाहिरात -spot_img
breaking news

शेवगावमध्ये चार चाकीतून विदेशी दारूची वाहतूक; पोलिसांनी केले असे…

साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त | आरोपी गजाआड | शेवगाव पोलिसांची कारवाई
शेवगाव | नगर सह्याद्री
शहरात चारचाकी वाहनातून बेकायदेशीररीत्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका इसमाला शेवगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडले. मुंढे चौक भागात सापळा रचून केलेल्या या कारवाईत पोलिसांनी दारूच्या बाटल्या आणि चारचाकी कार असा एकूण 4 लाख 31 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रामभाऊ तुळशीराम गुंजाळ (रा. दहिगाव ने, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

2 जुलै रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शेवगाव शहरातून एका चारचाकी गाडीतून दारूच्या बॉक्सची वाहतूक केली जाणार आहे. या माहितीची खात्री करण्यासाठी बोरसे यांनी तातडीने तपास पथक रवाना केले. पथकाने शेवगाव ते आखेगाव जाणाऱ्या रोडवरील मुंढे चौक येथे दबा धरून संशयास्पद कार अडवली.

अडवलेल्या वाहनाची झडती घेतली असता त्यात विदेशी दारूचा साठा आढळून आला. गाडीचालक रामभाऊ गुंजाळ याच्याकडे दारू वाहतूक किंवा विक्रीच्या परवान्याबाबत चौकशी केली असता, त्याच्याकडे कोणताही अधिकृत परवाना मिळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन टुबर्क बिअर 24 हजार रुपये किमतीच्या एकूण 120 बाटल्या (प्रत्येकी 650 मिली, दर 200 रु.), किंगफिशर बिअर 7 हजार 200 रुपये किमतीच्या एकूण 36 बाटल्या (प्रत्येकी 650 मिली, दर 200 रु.), चारचाकी वाहन 4 लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची सुझुकी स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 4 लाख 31 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिवाजी आठरे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप, तसेच पोलीस अंमलदार ईश्वर बैरड, शाम गुंजाळ, प्रशांत आंधळे, धनेश्वर पालवे, वसंत वैद्य, राजू बडे, राहुल अथरे, राहुल खेडकर आणि सचिन पिरगळ यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस कॉन्स्टेबल आबासाहेब गोरे करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  पाणी योजना यशस्वी पद्धतीने चालविण्याचे दिले धडे; संदेश कार्ले यांचे अधिकार्‍यांना मार्गदर्शन
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ