- जाहिरात -spot_img
breaking news

अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून उदयास येणार : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

​शिर्डी / नगर सह्याद्री :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक येत आहे. औद्योगिकदृष्ट्या जिल्ह्याला मुख्य केंद्र बनविण्याच्या उद्देशाने आवश्यक ती कार्यवाही निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

​जिल्ह्यातील शिर्डी, राहुरी व श्रीगोंदा तालुक्यातील औद्योगिक वसाहतींच्या संदर्भात मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या परिसरात औद्योगिक विकासाला चालना मिळावी, यासाठी औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीसंदर्भातील सर्व अडचणी दूर करून प्रशासकीय स्तरावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

​शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीबरोबरच राहुरी व श्रीगोंदा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीसाठी कार्यवाही करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे त्यांनी सूचित केले. राहुरी तालुक्यात कृषी विद्यापीठाची जागा औद्योगिक विकासासाठी मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. या औद्योगिक वसाहतींमुळे अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वाढत असलेल्या औद्योगिक गुंतवणुकीचा जिल्ह्याला मोठा लाभ होत आहे. या औद्योगिक विस्तारामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

हे सुद्धा वाचा :  मळगंगा देवीच्या घागर मिरवणुकीला अलोट गर्दी; जयजयकाराच्या घोषणांनी आसमंत दणाणला
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ