- जाहिरात -spot_img
breaking news

अमेरिका-इराण युद्धाचा पुन्हा भडका! ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा, दोन्ही देशांचे भीषण हल्ले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
पश्‍चिम आशियातील तणाव आता टोकाला पोहोचला असून अमेरिका आणि इराण पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणवर मोठा लष्करी हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट घोषणा केली आहे की, इराणसोबतचा तात्पुरता ‘युद्धबंदी करार’ आता अधिकृतपणे संपला आहे. मात्र, चर्चा सुरू ठेवण्यास त्यांनी संमती दिली आहे.

अमेरिकेचे इराणवर ८० हून अधिक ठिकाणांवर हल्ले!
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन हवाई दलाने इराणमधील तब्बल ८० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले. हॉरमुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्याला हे चोख आणि तातडीचे प्रत्युत्तर असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेने इराणच्या खालील यंत्रणा उद्ध्वस्त केल्या
इराणची हवाई संरक्षण यंत्रणा आणि रडार केंद्रे.
इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स’च्या ६० हून अधिक लढाऊ नौका.
क्षेपणास्त्र डागण्याची केंद्रे आणि लष्करी नियंत्रण कक्ष.
या लष्करी कारवाईसोबतच अमेरिकेने इराणची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने इराणला तेल विक्रीसाठी दिलेला विशेष परवाना तडकाफडकी रद्द केला आहे, ज्यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

इराणचेही अमेरिकेला प्रत्युत्तर; बहरीन, कुवेतमधील तळांवर डागली क्षेपणास्त्रे
अमेरिकेच्या या भीषण हल्ल्यानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकेच्या ८५ लष्करी तळांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा संयुक्त मारा केला.

इराणने बहरीनमधील अमेरिकेचा पाचवा नौदल विभाग आणि कुवेतमधील ‘अली अल सालेम’ या हवाई तळावर थेट हल्ला केल्याचा दावा केला आहे. इतकेच नाही तर, या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणारे अमेरिकेचे हायटेक ‘MQ9 ड्रोन’ देखील पाडल्याचा दावा इराणने केला आहे.

“अमेरिकेला चोख उत्तर देणार”
इराणच्या सर्वोच्च लष्करी कमांडने (‘खाताम अल-अंबिया’ सेंट्रल हेडक्वार्टर्स) अमेरिकेची ही कारवाई म्हणजे उघड आक्रमकता असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेला या हल्ल्याचे ‘धक्कादायक आणि सडेतोड उत्तर’ दिले जाईल, असा इशारा इराणने दिला आहे.

हे सुद्धा वाचा :  शेजारील देशातील पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...

ट्रम्प काय म्हणाले?
तुर्कीच्या अंकारा येथे आयोजित नाटो परिषदेत बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “माझ्या मते आता युद्धबंदी संपली आहे. इराणसोबत वेळ घालवणे म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय आहे. आमचे प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करू शकतात, परंतु त्याचा काही उपयोग होईल असे मला वाटत नाही.”

याआधी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव काहीसा निवळेल अशी चिन्हे होती, मात्र नव्या संघर्षामुळे या संपूर्ण क्षेत्रातील शांतता धोक्यात आली आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयानेही यावर चिंता व्यक्त केली असून दोन्ही देशांना पुन्हा युद्ध न पेटवण्याचे आवाहन केले आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रंप पुढे म्हणाले की, “इराण माझ्याशी खोटे बोलला. म्हणून आता तेहरानशी पुढील कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही तेहरानला अणु मुक्त बनवणार आहोत. यासाठी लवकरच योजना अमलात आणली जाईल.” इकडे इराणने अमेरिकेला उत्तर देताना म्हटले आहे की, “आम्ही युद्धासाठी तयार आहोत. अमेरिकेने होर्मुजमध्ये विश्वासघात केला आहे. त्यामुळे त्यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यावर विश्वास ठेवता येत नाही.”

डील संपवण्याबाबत ट्रंप काय म्हणाले?
ट्रंप म्हणाले, “इराणचे लोक कोणालाही सोडत नाहीत. त्यांनी मलाही लक्ष्य केले आहे. ते मला सोडणार नाहीत. ते लोक खूप गलिच्छ आहेत. मी त्यांना सांगितले आहे की, तुम्ही हल्ला केलात तर आम्हीही सोडणार नाही. इराणचे लोक कोणाचेही ऐकत नाहीत.” ट्रंप यांनी नाटो सदस्य देशांवरही टीका केली. ते म्हणाले, “नाटोचे सदस्य दहतवाद्यांशी सुरु असलेल्या लढाईत मला मदत करत नाहीत. मी नाटोबद्दल फारसा समाधानी नाही. तेहरानला मी अणु मुक्त बनवणारच. यासाठी आम्ही काम करत आहोत.”

खामेनेईच्या अंत्ययात्रेत ट्रंपविरोधात घोषणा
तेहरानमध्ये खामेनेई यांच्या अंत्ययात्रेत इराणमधील कट्टरपंथी लोकांनी “ट्रंपची हत्या करा” अशा घोषणा दिल्या होत्या. यावेळी “डेथ टू अमेरिका” अशी घोषणाबाजीही करण्यात आली. शिवाय, इराणच्या विशेषज्ञ परिषदेने एक फतवा जारी करून म्हटले होते की, ट्रंपची हत्या करणे हे सर्व इराणी लोकांसाठी धार्मिक कर्तव्य आहे.

हे सुद्धा वाचा :  आनंदवार्ता! मान्सूनचा जोर वाढला; महाराष्ट्रासह 14 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

करार का संपवला?
मंगळवार (७ जुलै) रोजी इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डने होर्मुजमध्ये कतार आणि सौदी अरेबियाच्या जहाजांवर हल्ला केला. यामुळे संतप्त झालेल्या अमेरिकेने ८ जुलैच्या सकाळी इराणच्या अनेक ठिकाणांवर हल्ला केला. इराणने प्रत्युत्तरादाखल कुवेत आणि बहरीनमध्ये हल्ले केले. अमेरिका यामुळे अत्यंत नाराज आहे. कतारनेही इराणला दोषी ठरवले आहे. कतारचे म्हणणे आहे की, इराणने ६० दिवस कोणत्याही जहाजावर हल्ला न करण्याचे वचन दिले होते, पण त्याने स्वतःच ते वचन मोडले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ