- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेरला पैशाच्या पावसाचे आमिष; १ कोटीची फसवणूक, काय घडलं पहा

भोंदूबाबाच्या दणयाने निघोजकरांना कोटीचा फटका
निघोज | नगर सह्याद्री –
निघोज येथे अंधश्रद्धा आणि झटपट श्रीमंतीच्या आमिषाला बळी पडून पाच जणांची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर येथे वास्तव्यास असल्याचे सांगणार्‍या एका भोंदूबाबाने पैशांची पूजा केल्यास १० पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून संबंधितांना जाळ्यात ओढले.

निघोजमधील एका व्यक्तीशी ओळख वाढवत भोंदूबाबाने आपल्याकडे अलौकिक शक्ती असल्याचा दावा केला. बनावट भक्तांच्या माध्यमातून विश्वास संपादन करून त्याने संबंधित व्यक्तीला तसेच इतर चार जणांना पैशांच्या पावसाचे स्वप्न दाखवले. त्यानंतर पाचही जणांनी जमीन गहाण ठेवणे, दागिने तारण ठेवणे तसेच सावकारांकडून कर्ज घेऊन एकूण १ कोटी रुपयांची रक्कम उभी केली. दरम्यान, ठरलेल्या दिवशी रात्रीच्या वेळी पूजा आयोजित करण्यात आली.

पूजेदरम्यान भोंदूबाबाने सर्वांना मौन पाळण्यास सांगून ‘तीर्थ’ दिले. हे तीर्थ घेतल्यानंतर काही वेळातच सर्वजण बेशुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. शुद्धीवर आल्यानंतर भोंदूबाबा आणि पैशांची रक्कम दोन्ही गायब झाल्याचे लक्षात आले.फसवणूक झाल्यानंतर संबंधितांनी शिरूर तसेच गुजरातपर्यंत भोंदूबाबाचा शोध घेतला, मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. या घटनेबाबत गावात दबया आवाजात चर्चा सुरू असली तरी अद्याप पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अंधश्रद्धा व भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता सजग राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

निघोजसारख्या समृद्ध गावात अंधश्रद्धेला खतपाणी
अशोक खरातसारखे भोंदू तुरुंगात जातात, त्यांची चर्चा होते. भोंदू बाबावर ताशेरे ओढण्याचे काम समाजात होते. मात्र असे असूनही निघोजसारख्या समृद्ध गावात अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम राजरोसपणे होत असून भोंदूबाबा तर कोटभर रुपये घेऊन पळून गेला आहेच. मात्र जे कुणी फसले आहेत, ते कोण आहेत, याचा शोध पोलिसांनी घेण्याची गरज आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम करणार्‍या या महाभागांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

हे सुद्धा वाचा :  अहिल्यानगरकर ‘गॅस’वर; रिक्षाचालकांंचे प्रचंड हाल...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ