- जाहिरात -spot_img
breaking news

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; पेपरच फुटला नाही…; काय घडलं

मुंबई | नगर सह्याद्री
देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणानंतर महाराष्ट्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेवर गंभीर आरोप झाले होते. मात्र, आता या प्रकरणाला नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. भरती प्रक्रियेत पेपरफुटी झाल्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच ती तक्रार बनावट असल्याचा दावा ई-मेलद्वारे केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

22 मार्च 2026 रोजी औषध निरीक्षक भरतीची लेखी परीक्षा पार पडली. त्यानंतर 12 जून रोजी निकाल जाहीर झाला. 1 ते 21 जुलै या कालावधीत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि 22 जुलै रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर 23 जुलै रोजी एमपीएससीला ई-मेलद्वारे एक तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीत परीक्षेपूव काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा आरोप करण्यात आला होता. काही उमेदवारांचे गुण संशयास्पदरीत्या वाढल्याचा तसेच गुणपत्रिका आणि अंतिम निवडीत विसंगती असल्याचाही दावा करण्यात आला होता.तक्रार प्राप्त होताच एमपीएससीने तक्रारदाराला सर्व उपलब्ध पुरावे सादर करण्यास सांगितले. तसेच संबंधित उमेदवार आणि तक्रारदार यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. आज या सर्वांची चौकशी करण्यात येत असून त्यांच्या जबाबांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

तक्रारदाराचाच यू-टर्न?
दरम्यान, या प्रकरणाला काल रात्री मोठे वळण मिळाले. तक्रारदाराने एमपीएससीला आणखी एक ई-मेल पाठवत, पूव केलेली तक्रार बनावट होती, असा दावा केल्याची माहिती एमपीएससीतील सूत्रांनी दिली आहे. या ई-मेलमध्ये पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही म्हणून पेपर फुटला अशी बतावणी करून पुन्हा परीक्षा घेण्यासाठी हा बनाव रचला, असे त्यात म्हटले आहे. 20 मार्च रोजी कथित संभाषण झालेल्या घटनेची तक्रार 24 जुलैपर्यंत इतक्या विलंबाने का झाली, याचाही तपास केला जात आहे.

हे सुद्धा वाचा :  दिवसाढवळ्या गोळीबार, धाड-धाड गोळ्या घातल्याने खळबळ; तिघांची प्रकृती गंभीर

एमपीएससीचा पेपर कसा फुटला? आ. पवार यांची पत्रकार परिषदेत पोलखोल
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठीचे अनेक पेपर फुटले आहेत. पैसे देऊन आणि आपल्या विचाराची लोक सिस्टीमध्ये जावी म्हणून काही लोकांनी महाराष्ट्रात नेटवर्क तयार केले आहे. एफडीएच्या अंतर्गत येणाऱ्या औषध निरीक्षक भरतीचा पेपरही असाच फुटला होता. यामध्ये एमपीएससीचा पूर्ण पेपर फुटला असे म्हणता येणार नाही. पण पेपर सेट करणारी व्यक्ती फुटली होती. या व्यक्तीने पैसे घेऊन दोन दिवस आधीच औषध निरीक्षक भरतीचा पेपर विद्यार्थ्यांना दिला होता, असा दावा रोहित पवार यांनी केला. रोहित पवार यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर मांडणी केली. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात टीईटी, नीट, एसआरपीएफ, एचएससी केमेस्ट्री, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोतवाल भरती, तलाठी भरती, महाजनको अशा विविध परीक्षांचे पेपर लीक झाले. या परीक्षांसाठी गरिबांची मुलं खूप परिश्रम घेतात. पण महाराष्ट्रात पैसे देऊन आणि आपल्या विचाराची लोक यंत्रणेत असावी या हेतूने पेपर लीक केले जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

नंदुरबार कनेक्शन समोर
या प्रकरणाचे धागेदोरे नंदुरबारपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे. कौटिल्य क्लासेसचे संचालक प्रवीण पाटील यांच्यावर पेपरफुटीचे आरोप करण्यात आले होते. मालेगावमधील एका विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार देत पाटील यांनी पाच लाखांची मागणी केल्याचा दावा केला होता. मात्र प्रवीण पाटील यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, माझ्याकडून कोणताही पेपर लीक झालेला नाही. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. एमपीएससीच्या अन्न व औषध निरीक्षक परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आलाय. तक्रारदारानेच आपली तक्रार बनावट असल्याचं मान्य केल्याने या प्रकरणात मोठा गोंधळ निर्माण झालाय. नंदुरबारच्या कोचिंग क्लास संचालकांवर झालेले आरोपही फेटाळण्यात आले असून आज होणाऱ्या चौकशीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ