- जाहिरात -spot_img
breaking news

नगर तालुका पोलिसांची हातभट्टी दारू अड्ड्यांवर धडक कारवाई; तीन ठिकाणीचे अड्डे उद्धवस्त..

नगर तालुका पोलिसांची हातभट्टी दारू अड्ड्यांवर धडक कारवाई; तीन ठिकाणीचे अड्डे उद्धवस्त / 72 हजार 500 रुपयांचे कच्चे रसायन नष्ट
अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत 72 हजार 500 रुपये किमतीचे सुमारे 1,450 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले.
या प्रकरणी खंडाळा (ता. अहिल्यानगर) येथील युवराज बजरंग गिऱ्हे व पोपट गिरधारी गिऱ्हे, तसेच खडकी येथील एका महिलेविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 65 (फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

छापेमारीदरम्यान दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेले कच्चे रसायन जप्त करून ते जागीच नष्ट करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाई सहाय्यक फौजदार दत्तात्रय हिंगडे, पोलीस हवालदार नितीन शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल विक्रांत भालसिंग यांच्या पथकाने केली.

हे सुद्धा वाचा :  मंत्री विखे पाटलांचा शेतकऱ्यांना दिलासा; उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या सूचना...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ