- जाहिरात -spot_img
breaking news

धक्कादायक! भाजप कार्यकर्त्यावर झाडल्या 9 गोळ्या; राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई / नगर अह्याद्री :
शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांदरम्यान मावळ तालुक्यातील देहू रोड येथे धक्कादायक गोळीबाराची घटना घडली आहे. भाजपच्या एका कार्यकर्त्याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रमेश रेड्डी असे मृत व्यक्तीचे नाव असून ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते. रात्रीच्या सुमारास त्यांच्यावर हल्लेखोरांनी तब्बल नऊ राऊंड गोळीबार केला. यातील एक गोळी त्यांच्या डोक्यात लागल्याने ते जागीच कोसळले.

जखमी अवस्थेत त्यांना तातडीने देहूरोड येथील आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती समजताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठा आक्रोश व्यक्त केला. काही काळासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत नागरिकांची समजूत काढली.

यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलवण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून शहरात नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर देहूरोड बाजारपेठेतील अनेक दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या हत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा :  खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला बीडमध्ये भीषण अपघात
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ