- जाहिरात -spot_img
breaking news

‘या’ तीन अटी मान्य करा युद्ध थांबवतो… इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केलं ट्विट

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
इराणने अखेर दोन आठवड्यांपासून सुरू असलेला इस्त्रायल आणि अमेरिकेसोबतचा लष्करी संघर्ष संपवण्याची तयारी दर्शवली आहे. यापूर्वी इराणने आम्ही अमेरिकेसोबत १० वर्षे लढू असे सांगितलं होतं. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील युद्ध लवकरच संपेल असे संकेत दिले होते. आता इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेस्कीन यांनी ट्विट करून आमच्या तीन मागण्या मान्य झाल्या तर इराण हा संघर्ष थांबवू शकतो असं सांगितलं आहे.

काय म्हणाले इराणचे राष्ट्रपती?
इराणचे लाष्ट्रपती मसूद यांनी ट्विट केलं की, ‘मी रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी बोललो. मी इराण या भागात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रतिबद्ध आहे हे पुन्हा एकदा सांगितलं. हे युद्ध थांबवण्याचा एकमेव मार्ग आहे. तो म्हणजे, ज्यांना झायोनिस्ट सत्तेनं आणि अमेरिकेनं हे युद्ध सुरू केलं आहे. त्यांनी इराणचे कायदेशीर हक्क मान्य करावेत. आम्हाला नुकसान भरपाई द्यावी आणि यापुढे असा हल्ला करणार नाही याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ठोस शाश्वती द्यावी.’

इराणच्या प्रवक्त्यांची धमकी
इराणचे प्रवक्ते अबोलफझल शेकराची यांनी जर वॉशिंग्टननं इराणच्या बंदरांवर हल्ला केला तर पर्शियन गल्फमधील कोणतेही बंदर, आर्थिक केंद्र किंवा कोणतेही लोकेशन आमच्या रडावर असेल असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर इराणच्या राष्ट्रपतींचा हा युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

अबोलफझल यांनी जर आमचे पोर्ट आणि डॉक रडावर असतील तर या भागातील सर्व बंदरे आणि डॉक आमच्या टार्गेटवर असतील. आम्ही आतापर्यंत जे काही केलं आहे त्यापेक्षाही जास्त तीव्रतेची हल्ले आम्ही करू अशी धमकी देखील त्यांनी दिली होती.

इस्त्रायललाही उपरती?
रायटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार इस्त्रायली अधिकारी यांनी बंद दाराआड चर्चा केली आहे. त्यात त्यांनी इराणसोबत सुरु असलेलं युद्ध असंच सुरू ठेवून इराणचे सध्याचे सरकार पाडता येईल याची कोणतीही शाश्वती नाही. कारण इतका बॉम्बवर्षाव करून देखील इराणमध्ये सरकारविरूद्ध अजून तरी कोणताही रोष किंवा उठाव दिसत नाहीये.

हे सुद्धा वाचा :  LPG सिलिंडरनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार, तेल कंपनीच्या 'त्या' निर्णयानं खळबळ

दुसरीकडं जरी युएसचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकर संपेल असं वक्तव्य केलं असलं तरी इस्त्रायलच्या मते अमेरिका लष्करी संघर्ष संपवण्याचे निर्देश देण्याच्या जवळपास देखील नाही. रॉयटर्सने हे वृत्त इस्त्रायलच्या दोन अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलं आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ