- जाहिरात -spot_img
breaking news

दहावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींनीच मारली बाजी; पहा सविस्तर…

मुंबई / नगर सह्याद्री –
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९२.०९ टक्के लागला. https://sscresult.mahahsscboard.in/ संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दहावीचा निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या निकालात मुलींनीच वर्चस्व गाजवले आहे.

मार्च-एप्रिल २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अधिकृतपणे जाहीर केला आहे. बारावीप्रमाणेच दहावीचा राज्याचा निकाल घसरला आहे. गतवर्षीपेक्षा दहावीचा निकाल २ टक्क्यांनी घसरला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालाच्या टक्केवारीत मुलांपेक्षा सरस कामगिरी करत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कोकणचा निकाल सर्वाधिक लागलाय.

पुणे, मुंबईसह अनेक विभागांचा निकाल समाधानकारक लागला आहे. सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा लागला आहे. थोड्याच वेळात विद्यार्थ्यांना https://mahahsscboard.in/ अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. (MSBSHSE result) राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी बारावीच्या निकालाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

निकालाची महत्त्वाची आणि ठळक वैशिष्ट्ये काय?
राज्याचा एकूण निकाल : ९२.०९ टक्के
मुलींचा निकाल : ९४.९६ टक्के
मुलांचा निकाल : ९०.५६ टक्के
सर्वात जास्त निकाल असलेला विभाग : कोकण ९७.६२

कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के लागला?
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागातून १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यामध्ये कोकण, मुंबई आणि पुणे विभागाचा निकालही चुरशीचा लागला आहे.

कोकण:९७.६२ टक्के
पुणे: ९४.२४ टक्के
नागपूर: ८९.०७ टक्के
मुंबई: ९४.९७ टक्के
कोल्हापूर: ९५.४७ टक्के
अमरावती: ९०.५० टक्के
नाशिक: ९०.५३ टक्के
लातूर: ८८.४२ टक्के
छत्रपती संभाजीनगर: ८८.४१ टक्के

एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी: १५ लाख ५५ हजार ०२६
उत्तीर्ण विद्यार्थी: १४ लाख २० हजार ४८६

हे सुद्धा वाचा :  नारायणगव्हाण रस्त्याबाबत अंतिम इशारा....16 जुलै रोजी प्रशासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा

निकाल कुठे पाहायचा?
विद्यार्थी आपला निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहू शकतात:
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
https://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
https://results.navneet.com

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ