- जाहिरात -spot_img
breaking news

शेवगावात अतिक्रमण कारवाईविरोधात टपरीधारकांचे उपोषण… अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट

टपरीधारकांमध्ये तीव्र असंतोष

शेवगाव | नगर सह्याद्री
नगरपरिषदेमार्फत जुना बाजारतळ आणि महात्मा गांधी वाचनालय परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात स्थानिक टपरीधारकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देऊन ही कारवाई तत्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, बाधित टपरीधारकांनी 2 जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण आणि शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात नगरपरिषदेच्या कारवाईवर गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जून 2025 मध्ये नगरपरिषदेने 9 मीटर रस्ता मोकळा करण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या. त्यावेळी टपरीधारकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करत स्वतःहून रस्ता खुला करून दिला होता, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

29 मे पासून सुरू झालेल्या या नव्या अतिक्रमण हटाव मोहिमेत प्रशासनाकडून अधिकारांचा अतिरेक होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. नगरपरिषदेच्या मालकीची नसलेली जागाही अतिक्रमण म्हणून दाखवून टपरीधारकांवर बेकायदेशीर कारवाई केली जात आहे. शासनाचे नकाशे आणि 1960 पासूनचे शासकीय अभिलेख (रेकॉर्ड) तपासल्यास ही जागा महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असल्याचे स्पष्ट होते, असा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.

या परिसरातील अनेक टपरीधारक गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या व्यवसायांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. काहींनी बँकांचे किंवा खासगी कर्ज काढून आपले व्यवसाय उभे केले आहेत. कोणत्याही पूर्व नियोजनाशिवाय आणि पुनर्वसनाची पर्यायी व्यवस्था न करता प्रशासनाने अचानक ही कारवाई सुरू केल्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले असून, टपरीधारकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून कारवाई थांबवावी आणि टपरीधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर दत्तात्रय फुंदे, ॲड. सुभाष पाटील लांडे, प्यारेलाल शेख, रवींद्र काळे, अर्शद सलीम शेख, सचिन सूर्यवंशी, अतिक शेख, गणेश रणखांब, जमीरुद्दीन शेख, सचिन नाईकवाडी, इम्रान शेख, राजेंद्र लोखंडे, जावेद खान पठाण, एजाज मणियार, समद काझी, दिनेश पन्हाळे

हे सुद्धा वाचा :  व्हीप बजावूनही शिवसेना खासदार गैरहजर! काय कारवाई होणार? कायदा काय सांगतो? पहा सविस्तर
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ