अहिल्यानगर | नगर सह्याद्री
कुठे आकाशात फुगे सोडून, कुठे विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटून तर बऱ्याच ठिकाणी गुलाबपुष्प देऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. आहिल्यानगर शहरातील बहुतांश शाळांमध्ये असेच दृश्य दिसून आले.
महाराष्ट्रात सर्वत्र 15 जून रोजी शाळा सुरू झाल्या. अहिल्यानगरमध्येही त्या सुरू झाल्या. बहुतांश शाळांमध्ये पुढील वर्गात प्रवेश करण्यासाठी मागच्या वषचे विद्याथ तर काही प्रथमच शाळेत पहिल्यांदा पाऊल ठेवणारे विद्याथ असे दृश्य दिसून आले. उन्हाळी सुट्टी संपल्याने सुट्टीतील उपभोगलेला आनंद मागे सारीत शालेय जीवनाचा आनंद घेण्यासाठी विद्याथ शाळेत प्रवेश करत होते. त्यांचे गुलाबाची फुले देऊन शाळेत स्वागत करण्यात आले. या स्वागताने विद्याथ हरखून गेले.

बऱ्याच शाळांमध्ये यावेळी आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडण्यात आली. विद्याथ पहिल्याच दिवशी शाळेचा पारंपरिक गणवेश घालून आले होते. काही शाळांमध्ये झाडांची रोपेही वाटण्यात आली व विद्यार्थ्यांना वृक्षारोपणास उद्युक्त करण्यात आले. काही शाळांमध्ये सनई-चौघडा वाजविण्यात आला. मुलांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. पाठ्यपुस्तकांचेही वितरण करण्यात आले. अनेक शाळांमध्ये रंगीबेरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे वाद्यसंगीताने व औक्षण करून स्वागत करण्यात आले. नवीन गणवेश, नवीन दप्तर, रंगीत डबा व वॉटरबॅगसह शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. काही शाळांमध्ये मिष्टान्न देण्यात आले. अशा विविध उपक्रमांनी नगर शहरात शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला.










