- जाहिरात -spot_img
breaking news

अतिवृष्टीचा फटका; टोमॅटो उत्पादकांचे गणित कोलमडले

उत्पादनात मोठी घट, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने टोमॅटो पिकावर विविध बुरशीजन्य, विषाणूजन्य व जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी अनेक ठिकाणी टोमॅटोची झाडे पिवळी पडून फळांचे नुकसान होत असल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे.

तालुक्यात वासुंदे, शिक्री, म्हसोबा झाप, पोखरी, देसवडे, खडकवाडी, पळशी, वनकुटे, ढवळपुरी, टाकळी ढोकेश्वर, निघोज, पिंपळनेर, लोणी मावळा, अळकुटी आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड करण्यात आली आहे. सध्या तोडणीच्या हंगामातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे मुळांना हवा मिळत नसून झाडे सुकू लागली आहेत. काही ठिकाणी फळांना तडे जाऊन ती काळी पडत असल्याने विक्रीयोग्य उत्पादन कमी झाले आहे.

बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली असली तरी दरांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. उत्पादन घटल्याने वाहतूक, मजुरी आणि औषध फवारणीचा खर्च वाढला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. शेतकऱ्यांनी वेळोवेळी औषध फवारणी व पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असले तरी सततच्या पावसामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पारनेर तालुक्यातील टोमॅटो उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा :  मनपाच्या 'त्या' निर्णयाला कर्मचाऱ्यांचा विरोध, दिला 'हा' इशारा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ