राहुरी | नगर सह्याद्री
हिंदू व मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान म्हणून परंपरागत ओळख असलेल्या बुवासिंद बाबा या देवस्थानमध्ये हिंदू धर्माप्रमाणे पूजा, आरती न करता मुस्लिम रितीरिवाजनुसार पुजा करावी हा वक्फ बोर्डाचा आदेश असलेला फलक देवस्थान परिसरात लावण्यात आल्याने हिंदू बांधवांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
राहुरी शहरातील बुवासिंददेव बाबा देवस्थान मध्ये परंपरेनुसार दर गुरुवारी हिंदू बांधवांच्या वतीने नाथांची आरती होत असते. तसेच हिंदू रितीरिवाजानुसार पूजा अर्चा देखील केली जात आहे. मात्र, त्या ठिकाणी आता हिंदू रितीरिवाजानुसार कोणतेही देवकार्य करता येणार नाही, असा फलक लावल्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून बुवासिंद बाबा देवस्थानमध्ये पूजा करण्यास एका विशिष्ट समाजाने हरकत घेतली होती. मात्र, ही परंपरा जुनी असल्याने याबाबत निर्माण झालेला वाद न्यायालयात गेला आहे. दोन वर्षांपूव पूजा करण्यावरून दोन समाजात मोठा वाद झाल्यानंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वक्फ बोर्डाच्या आदेशाने देवस्थान परिसरात एक फलक लावण्यात आला. या आदेशानुसार मुस्लिम परंपरेव्यतिरिक्त इतर कोणतेही धार्मिक कृत्य करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास पोलिसांच्या मदतीने तात्काळ थांबवण्यात येतील, असे म्हटले आहे.










