- जाहिरात -spot_img
breaking news

लोकनेते घुले पाटील हे आदर्श राजकारणी : हभप. ज्ञानेश्वर कदम

 

भेंडा | नगर सह्याद्री
घुले पाटील नावाच्या ब्रह्मगिरीतून नेवासा-शेवगाव तालुक्यासह नगर जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा उदयास आल्याने शेतकरी, कष्टकरी आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या भक्कम झाला. लोकनेते मारुतरावजी घुले पाटील हे आधारतीर्थ, शिक्षणप्रेमी, आदर्श पिता, कुशल संघटक, परमार्थ प्रेमी आणि आदर्श राजकारणी होते, असे गौरवोद्गार श्री क्षेत्र आळंदी येथील हभप.ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांनी काढले.

भेंडा(ता.नेवासा) येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या 24 व्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवारी सकाळी भेंडा येथील श्रीसंत नागेबाबा भक्तनिवासमध्ये आयोजित कीर्तनाच्या कार्यक्रमात कदम महाराज बोलत होते.

कीर्तनाच्या प्रारंभी ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज, ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, ॲड. देसाई देशमुख, डॉ.क्षितिज घुले पाटील, राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितिन पवार व इतर मान्यवरांनी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते घुले पाटील यांचे स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

हभप कदम महाराज पुढे म्हणाले की, लोकनेते मारुतराव घुले पाटलांनी साखर कारखान्याला ज्ञानेश्वर माऊलींचे नाव दिले, त्याचबरोबर कारखान्याच्या गेटसमोर माऊलींचे मंदिरही बांधले. कारखान्याला माऊलींचे नाव असल्यामुळे अल्कोहोलनिर्मिती केली मात्र दारू निर्मिती केली नाही, यावरून त्यांचे परमार्थ प्रेम दिसून येते. गोरगरिबांची मुले, मुली उच्चशिक्षित व्हावी, यासाठी शिक्षण संस्था काढून ज्ञानाची दालने उघडी करणारे घुले पाटील या परिसराचे कर्मवीर भाऊराव पाटीलच होते. त्यांचे जीवन अविस्मरणीय आहे. घुले पाटलांचा विचारांचा आणि विकासाचा वारसा नरेंद्र घुले पाटील व चंद्रशेखर घुले पाटील ही राम-लक्ष्मणाची जोडी पुढे नेत आहेत.श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरी महाराज, श्रीसदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त देविदास महाराज म्हस्के, राम महाराज झिंजूर्के, रामनाथ महाराज काळेगावकर, रमेशानंदगिरी महाराज, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक पंडितराव भोसले, अशोकराव मिसाळ, डॉ.नारायण म्हस्के, जनार्धन कदम, मच्छिंद्र म्हस्के, बबनराव भुसारी, ॲड.हिम्मतसिंह देशमुख, अमोल अभंग, विकास नन्नवरे, संतोष पावसे, जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड, दत्तात्रय काळे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, मुळा साखर कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब मोटे, माजी उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, काशिनाथ नवले, जनार्धन पटारे, संजय कोळगे, ताहीर पटेल, अनिल मडके, बबनराव धस, काकासाहेब शिंदे, शिवाजी कोलते, भाऊसाहेब कांगुणे, दादासाहेब गंडाळ, विष्णू जगदाळे, सखाराम लव्हाळे, अजित मुरकुटे, डॉ.शिवाजी शिंदे, कामगार संघटनेचे सचिव संभाजीराव माळवदे, अण्णासाहेब गर्जे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कारखान्याचे अधिकारी व कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा; शिवसेनेने चिकटवले आयुक्तांच्या खुचला निवेदन
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ