कुंभ : समाजात आणि ऑफिसमध्ये तुमचा मान-सन्मान वाढेल. धनलाभाचे योग असून आर्थिक स्थिती सुधारेल.
मेष : आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा.
वृषभ : दिवस अतिशय अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल आणि मान-सन्मानात वाढ होईल.
मिथुन : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील.
कर्क : आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. धनलाभाचे योग आहेत. व्यापारी वर्गासाठी दिवस फायदेशीर राहील.
सिंह : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. घाईघडीत कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.
कन्या : तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. जुन्या मित्रांची भेट होऊ शकते.
तूळ : कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण शांत आणि आनंददायी राहील
वृश्चिक : तुमच्या स्वभावात झालेले सकारात्मक बदल इतरांना आवडतील. कौटुंबिक जीवनात सुख-शांती लाभेल. धार्मिक कार्यात आवड वाढू शकते.
धनु : प्रवासाचे योग जुळून येतील. मुलांच्या आरोग्याची किंवा अभ्यासाची काळजी वाटू शकते. संयमाने काम घ्यावे..
मकर : आर्थिक गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी समजेल. आरोग्याची काळजी घ्या.
मीन : नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. मनातील चिंतेचे ढग दूर होऊन उत्साह वाढेल.












