- जाहिरात -spot_img
breaking news

विहिरीचे मोजमाप, जिओ टॅगिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यावर हल्ला; कुठे घडला प्रकार पहा…

पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला मारहाण
जामखेड | नगर सह्याद्री
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) मंजूर विहिरीच्या कामाची पाहणी, मोजमाप व जिओ टॅगिंग करण्यासाठी गेलेल्या पंचायत समितीच्या तांत्रिक सहाय्यकावर शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यातील लोणी येथे घडली.  संबंधिताविरुद्ध खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दीपक दत्तात्रय बोराडे (वय 40, रा. मलठण, ता. कर्जत) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोराडे हे पंचायत समिती, जामखेड येथे तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवार दि. 17 जून रोजी सकाळी सुमारे 9 वाजता बोराडे हे ग्रामरोजगार सेवक शिवाजी आप्पा बामदळे व विहीर लाभाथ अविनाश बबन घुमरे यांच्यासह लोणी येथे मनरेगा अंतर्गत मंजूर विहिरीच्या कामाचे मोजमाप व जिओ टॅगिंग करण्यासाठी गेले होते. शासकीय नियमानुसार सुरू असलेल्या या कामादरम्यान अचानक अन्सार नवाब पठाण (रा. लोणी, ता. जामखेड) घटनास्थळी आला.गावात येण्यापूव मला सांगायला हवे होते, असे म्हणत त्याने बोराडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

त्यानंतर शिवीगाळ करत आक्रमक भूमिका घेतली. परिस्थितीचे चित्रीकरण करण्यासाठी मोबाईलवर व्हिडिओ सुरू केल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात बोराडे यांची गचांडी पकडून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता हातातील दगड त्यांच्या डाव्या पायावर फेकून मारल्याने त्यांना दुखापत झाली. मारहाणीनंतर आरोपीने यापुढे गावात आलास तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली आणि तेथून निघून गेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. दरम्यान, खर्डा पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा :  शहराचा दोन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत, मनपाने केले असे आवाहन...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ