- जाहिरात -spot_img
breaking news

भंडारदरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस; कळसूबाई शिखराजवळ दरड कोसळल्याने… काय घडलं पहा

राजूर | नगर सह्याद्री
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात झालेल्या ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे कळसूबाई शिखराजवळ मोठी दरड कोसळली असून पांजरे परिसरातील ३० ते ४० एकर भातशेती गाडली गेली आहे. ओढ्यांनी मार्ग बदलल्याने गांगडवाडीतील घरांमध्ये गाळयुक्त पाणी शिरले आहे.

दरम्यान, भंडारदरा धरण भरण्याच्या मार्गावर असून प्रवरा नदीत १० हजार युसेसपर्यंत विसर्ग सोडण्यात आला आहे. पांजरे गावाजवळील कळसूबाई शिखराजवळील डोंगराची दरड कोसळण्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेमुळे डोंगरावरील झाडे उन्मळून थेट ओढ्यातून वाहत पांजरे परिसरात आली. दरडीच्या दगडगोट्यांमुळे ओढ्यांनी मार्ग बदलला, तर अनेक शेतकर्‍यांचे शेतीचे बांध फुटून भातशेती वाहून गेली आहे.

ही घटना महसूल विभागाला कळवल्यानंतर तात्काळ प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. वन्यजीव विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या घटनेची पाहणी केली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात अतिवृष्टी होत असल्याने भंडारदरा धरण भरण्याच्या मार्गावर आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा शनिवारी सकाळी सहा वाजता १० हजार ००१ दलघफूट झाला असून धरणाच्या सांडव्यामधून नऊ हजार ६२८ युसेसने विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडला जात आहे. गेल्या २४ तासांत भंडारदरा येथे १०९ मिमी, पांजरे १८९ मिमी, घाटघर १९५ मिमी, रतनवाडी १५५ मिमी तर वाकी येथे १२२ मिमी पाऊस झाला. निळवंडे धरणामध्ये भंडारदरा धरणामुळे पाणी विसर्जित होत असल्याने धरण ७८.७४ टक्के भरले असून धरणाचा पाणीसाठा सहा हजार ५६३ दलघफूट झाला आहे.

हे सुद्धा वाचा :  पाण्याचा व्हॉल्व्ह फुटला..; टंचाई काळात हजारो लीटर पाणी वाया
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ