आजचे राशिभविष्य – २७ जुलै २०२६
नगर सह्याद्री वेब टीम
ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
मिथुन : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
सिंह : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होती
कन्या : कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह व उमेद वाढेल.
तुळ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.
मीन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.










