- जाहिरात -spot_img
breaking news

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम लवकरच सुरु होणार ः आ. जगताप

स्मारक समितीच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी | स्मारकाला विरोध करणार्‍यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन होत असून, त्यांच्या विचाराने एकत्र येत आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या कामाचा भूमीपूजन सोहळा झालेला असून, लवकरच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी चांगल्या पध्दतीने काम सुरु होणार असल्याची खात्री महापालिका आयुक्तांनी दिली असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

शहरात थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती महात्मा फुले दांम्पत्य स्मारक समितीच्या वतीने साजरी करण्यात आली. माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महात्मा फुले यांच्या नियोजित स्मारकाला विरोध करणार्‍यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या.

या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी मनपा आयुक्त यशवंत डांगे, सुरेश इथापे, स्मारक समितीचे प्रा. माणिक विधाते, किशोर डागवाले, बाळासाहेब भुजबळ, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेवक सुरेश बनसोडे, दत्ता गाडळकर, प्रकाश भागानगरे, सुजाता पडोळे, रुपाली दातरंगे, संदीप दातरंगे, सुनंदाताई भुजबळ, पंडितराव खरपुडे, ज्ञानेश्वर रासकर, संजय खामकर, राजेंद्र पडोळे, विनोद पुंड, मनेष साठे, गोरख पडोळे, विष्णुपंत म्हस्के, डॉ. रणजीत सत्रे, अवधूत फुलसौंदर, राजेंद्र ताठे, प्रा. शिवाजी विधाते, आनंद पुंड, रोहित पठारे, रामदास फुले, ब्रिजेश ताठे, चंद्रकांत पुंड, मच्छिंद्र बनकर, कॅप्टन सुधीर पुंड, माऊली गायकवाड, अनिल इवळे, रमेश चिपाडे, ज्ञानदेव खराडे, संजय ताजणे, डॉ. दामोधर कळमकर, अ‍ॅड. गाडेकर, अ‍ॅड. अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, अंधारलेल्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देऊन महात्मा फुले यांनी शैक्षणिक क्रांती केली. शिक्षणची शक्ती त्यांनी जाणल्यामुळे बहुजन समाजासह महिलांना शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रयत्नाने महिलांना शिक्षणाची दारे उघडी झाली. मुलींसाठी शाळा काढून स्त्री सक्षमीकरणाचा पाया त्यांनी रोवला. त्यांचे विचार जीवंत ठेऊन सर्व समाजाला प्रेरणा व स्फुर्ती देण्यासाठी शहरात उभे राहत असलेले महात्मा फुले यांचे नियोजित स्मारक दिशा देणारे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :  राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पै. चेतन रेपाळेची निवड ; शिवछत्रपती कुस्ती संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ