- जाहिरात -spot_img
breaking news

इंधन तुटवड्याची अफवा; पेट्रोल पंपांवर उसळली गर्दी…, काय घडलं पहा

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पेट्रोलपंप चालकांचे आवाहन
राहाता | नगर सह्याद्री

इराण-इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्याने राहाता तालुयात मोठा गोंधळ उडाला. केवळ पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही, अशी चर्चा सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर वेगाने पसरल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपांकडे मोठी धाव घेतली. दरम्यान प्रशासनासक पेट्रोल पंप चालकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

राहाता शहरासह तालुयातील विविध पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी वाहनधारकांमध्ये इंधन भरण्यासाठी चढाओढ दिसून आली. काही ठिकाणी किरकोळ वादाचेही प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. विशेषतः व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याच्या बातम्यांमुळे पेट्रोल आणि डिझेलबाबतही संभ्रम वाढला आहे. यामुळेच नागरिकांनी खबरदारी म्हणून वाहनांमध्ये इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसून आले.पेट्रोल पंप चालकांनी मात्र या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. पुरवठा नियमित सुरू आहे, असे पंप चालकांनी स्पष्ट केले.

काही ठिकाणी टँकर उशिरा पोहोचल्याने तात्पुरती अडचण निर्माण झाली असली तरी ती तुटवड्याची परिस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले.तसेच इंधन पुरवठा करणार्‍या कंपन्यांनी काही नवीन नियम लागू केल्याने वितरण प्रक्रियेत थोडा विलंब होत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याचा दीर्घकालीन तुटवड्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अफवांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक गर्दी टाळून अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असेही सांगण्यात आले आहे. सध्या तरी इंधनाचा कोणताही वास्तविक तुटवडा नसतानाही केवळ अफवांमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

हे सुद्धा वाचा :  चिचोंडी पाटीलला भरदिवसा लुटमार; घटस्फोटास नकार, जावयाला बेदम मारहाण; माळीवाड्यात छापेमारी...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ